शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात ‘माइंड लॉजिक’ला ६७ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:58 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक्स कंपनीला ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 अमरावती - संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक्स कंपनीला ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. देयके अदा करण्यापूर्वी दंडाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

   विद्यापीठात माइंड लॉजिक्स कंपनीचे सन २०१६ पासून आगमन झाले. मात्र, विधी, फार्मसी आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा आणि निकालात प्रचंड गोंधळ उडाला होता. सलग तीन वर्षांचा कालावधी होऊनही ऑनलाईन निकालात फारशा सुधारणा झाल्या नव्हत्या. अखेर सिनेट सभेने माइंड लॉजिक्ससोबत झालेला करार आणि निकालातील गोंधळाबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या अध्यक्षतेत समितीने माइंड लॉजिक्सने परीक्षा आणि निकालात घातलेल्या गोंधळबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे सादर केला. आॅनलाइन निकाल आणि केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठविण्याचे दर यात बरेच गौडबंगाल असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मराठे समितीने सादर केलेल्या चौकशी अहवाल व्यवस्थापन समितीसमोर मांडला गेला. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीसुद्धा ‘माइंड लॉजिक्स’वर अधिकाधिक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, माइंड लॉजिक्सने पाऊणे दोन कोटींची देयके मिळण्यासाठी वित्त विभागाकडे सादर केलेली फाइल रोखण्यात आली. कार्यवाही पूर्णहोईस्तोवर देयके अदा करू नये, असा निर्णय व्यवस्थापन सभेत घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनाने कारवाई केली. पहिल्या टप्प्यात माइंड लॉजिक्सकडून ४६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. एकूण बिलाच्या १५ टक्के दंड वसुलीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.

विश्रामगृहाचे भाडे वसूलविद्यापीठातील विश्रामगृहाचे कक्ष माइंड लॉजिक्सच्या कर्मचा-यांनी  वापरल्या प्रकरणी ३ लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तशी शिफारस परीक्षा विभागाने वित्त विभागाकडे पाठविली तसेच महाविद्यालयात ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठविण्यात हयगय झाल्याप्रकरणी आठ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम वित्त विभाग वसूल करणार आहे. 

 प्राचार्य ए.बी. मराठे समिती आणि व्यवस्थापन परिषद, सिनेट सभेने घेतलेल्या निर्णयानुसार माइंड लॉजिक्सकडून दंड वसूूल केला जात आहे. एकूण १५ टक्के बिलात कपात म्हणून आता ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.    - हेमंत देशमुख,    संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ