शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के पाणीसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:27 IST

आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देयवतमाळ, अमरावती जिल्ह्याची स्थिती चांगलीबुलडाणा तहानलेलेच

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के सरासरी पाणीसाठा शिल्लक आहेत. यामध्ये नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने या जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेलेच असल्याने उन्हळ्यात या जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या कारणाने प्रशासनाचे व नागरिकांची चिंता वाढली आहे.आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पाचही जिल्ह्यांतील नऊ मोठ्या प्रकल्पामध्ये सरासरी ६०.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती थोडी चांगली असून, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१.१७ टक्के पाणीसाठा आहे. ४६६ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.७३ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये सर्व प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा २०९०.८८ दलघमी शिल्लक आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, व वाशिम जिल्ह्याच्या अनेक मध्यप प्रकल्पांची स्थिती चांगली असून, काही प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प मात्र ४० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले नाहीत. त्या कारणाने चिंता वाढली आहे. पाचही जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांची स्थितीमोठ्या प्रकल्पातून त्या-त्या जिल्ह्यातील शहराला व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे अप्पर वर्धा धरण यावेळीस पुरेसे भरले नाही. मध्य प्रदेश व काटोल परिसरात पाऊस हवा होता. तेथील नद्यांना पूर न आल्याने धरणात फक्त आजपर्यंत ५२.१० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प १०० टक्के, अरुणावती ९५.५० टक्के, बेंबळा ६०.७७ टक्के भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ९४.२७ टक्के, वान ९६.४४ टक्के भरले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती अतिशय नाजूक असून, नळगंगा प्रकल्पात १८.१० टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात १९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई