शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार मजूर, ६२ कोटी अडकले, स्थलांतर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:31 IST

होळीपूर्वी मजुरांचे वेतन देण्याची मागणी : केवळराम काळे यांचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जवळपास ६० हजार मजुरांचे ६२ कोटींपेक्षा अधिक मजुरीची रक्कम न मिळाल्याने त्यांची होळी अंधारात जाण्याची भीती 'लोकमत'मध्ये प्रकाशित करताच त्याची दखल घेत मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेट घेऊन पत्र दिले आणि निधीची मागणी केली.

मेळघाट विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल भाग असून चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर वर्ग महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून कामे करीत आहेत. परंतु मेळघाटमधील मजुरांची मजुरी ही मागील चार ते पाच महिन्यांपासून अद्यापपर्यंत मिळालेली नाही. मजुरांना उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसल्याने मेळघाटमधील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.

तीन महिन्यांपासून वेतन नाहीमागील तीन महिन्यांपासून मेळघाटातील आदिवासी मजुरांचे वेतन मिळाले नाही. वेतन मिळावे यासाठी आदिवासींनी ताला ठोको आंदोलन झाले. तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आमसभेत लाडकी बहिणीच्या पैशाच्या भरवशावर घरदार चालत असल्याचे आदिवासी महिला सरपंचाने सांगितले. यावेळी तत्काळ मजुरांना त्यांचे वेतन देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

शासन निर्णयाची आठवण, होळी सणशासन निर्णयाप्रमाणे मजुरांना १५ दिवसांपर्यंत मजुरी मिळणे अपेक्षित असताना व आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा मुख्य सण होळी असून मजुरी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. तरी आपण १३ मार्च रोजी होणाऱ्या होळी सणापूर्वी रोहयोचे काम करणाऱ्या मजुरांचे पगार देण्याची मागणी आ. काळे यांनी केली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMigrationस्थलांतरण