अमरावती परिमंडळातील ६० टक्के ग्राहक भरताहेत ऑनलाइन बिल

By उज्वल भालेकर | Published: October 12, 2023 06:57 PM2023-10-12T18:57:03+5:302023-10-12T18:57:29+5:30

डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हचा भाग म्हणून महावितरणच्या ग्राहकांना ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

60 percent of customers in Amravati circle pay their bills online | अमरावती परिमंडळातील ६० टक्के ग्राहक भरताहेत ऑनलाइन बिल

अमरावती परिमंडळातील ६० टक्के ग्राहक भरताहेत ऑनलाइन बिल

अमरावती : महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ६० टक्के ग्राहक वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करत आहेत. त्यामुळे त्यांना बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये) इतकी सवलत देण्यात येत आहे. डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात ९८ हजार ३३४ ग्राहकांची वाढ झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हचा भाग म्हणून महावितरणच्या ग्राहकांना ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ व्यवस्थापक विजय पचारे आणि सर्व विभागीय कार्यकारी अभियंते यांच्या पुढाकाराने ग्राहकांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. अमरावती परिमंडळांतर्गत येणाऱ्या जुलै महिन्यात ३ लाख ३ हजार ५८३ ग्राहक विजेचे बिल डिजिटल पेमेंटने करत होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ३१ हजार ७९१ ग्राहकांची वाढ झाल्यानंतर ग्राहकसंख्या ३ लाख ३५ हजार २०२ इतकी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ९८ हजार ३३४ ने वाढ झाल्यानंतर ग्राहकांची संख्या ४ लाख ३३ हजार ५३६ वर पोहचली. यामध्ये लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीत ६० टक्के ग्राहकांचा समावेश आहे.

ऑनलाइनसाठी अशी मिळते सवलत

वीज ग्राहकांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना एकूण बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रु.) इतकी सवलत देण्यात येते. तसेच बिल जनरेट झाल्यानंतर सात दिवसांच्या आत वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना एक टक्का एवढे प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट देण्यात येते. याशिवाय पर्यावरण स्नेही गो ग्रीन सवलत घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक बिलात १० रुपयांची सवलत देण्यात येते.

Web Title: 60 percent of customers in Amravati circle pay their bills online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.