लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एका सर्पमित्राच्या घरी तस्कर जातीच्या सापाने १ आॅगस्ट रोजी सहा अंडी दिली. त्या अंड्याचे काय करायचे लक्षात न आल्याने सदर अंडी 'युथ कंझर्वेशन आॅफ वाईल्ड अॅनिमल अॅन्ड मल्टीपर्पज सोसायटी'चे अध्यक्ष रत्नदिप वानखडे यांच्याकडे आणून उबविली. ६२ दिवसांनंतर त्यातून पिलं बाहेर आली. सापाची अंडी उबवण्यासाठी योग्य तापमान व दमट वातावरणाची आवश्यकता असते. पण ते कृत्रिमरीत्या पुरविणे शक्य होत नाही. सर्पतज्ज्ञ रत्नदीप वानखडे यांनी अनेक दुर्मिळ सापांची अंडी कृत्रिमरित्या उबवण्याची पद्धत शोधली आहे. भविष्यात या पद्धतीचा उपयोग करून दुर्मिळ जातीच्या सापांची संख्या वाढविण्यासाठी होवू शकते.सापांचे लिंग निर्धारण तेथील तापमानावर अवलंबून असते. तापमान बदलल्यास अंड्यांतील सापांचे लिंगसुद्धा बदलतात. याआधीही सापांच्या ९ अंड्यांमधून पिलं बाहेर काढल्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. ह्युमिनिटी बॉक्स तयार करण्यासाठी ठिकठिकाणाहून माहिती गोळा करण्यात आली. या कामात संस्थेचे सदस्य विक्की गावंडे, शुभम गायकवाड, अक्षय होले, धवल कुंभरे, पवन इंगोले, सागर मैदानकर आदींनी परिश्रम घेतले.
कृत्रिम पद्धतीने अंडी उबवून ६ सापांच्या पिलांचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 21:37 IST
एका सर्पमित्राच्या घरी तस्कर जातीच्या सापाने १ आॅगस्ट रोजी सहा अंडी दिली. त्या अंड्याचे काय करायचे लक्षात न आल्याने सदर अंडी 'युथ कंझर्वेशन आॅफ वाईल्ड अॅनिमल अॅन्ड मल्टीपर्पज सोसायटी'चे अध्यक्ष ....
कृत्रिम पद्धतीने अंडी उबवून ६ सापांच्या पिलांचा जन्म
ठळक मुद्देदुर्मिळ सापांची संख्या वाढविण्यास उपयोगी : 'युथ कन्झर्वेशन अॅनिमल सोसायटी'चे मार्गदर्शन