शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती येथे राष्ट्रीय कृषि प्रदर्शनात ५१ लाखांचा ‘सुलतान’ आकर्षण 

By गणेश वासनिक | Updated: December 28, 2023 16:28 IST

वळूचे वजन ११०० किलो; लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस, पाकिस्तान सीमेवरची चोलीस्तानी गाय, ३५ लिटर दूध देणारे ‘होलस्टेन फ्रिसन’

अमरावती - कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरपासून राष्ट्रीय कृषी प्रदर्शन येथील श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. ही कृषी प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहील. उभी पिक, पशू प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, खाद्य बाजार व विस्तीर्ण परिसर व विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व एकाच ठिकाणी दररोज सलग ४ दिवस ही लोकांसाठी खास बाब आहे. मात्र या प्रदर्शनीमध्ये आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेला ‘सुलतान’ रेडा सर्वांचा लक्ष वेधून घेत असून त्याची किंमत ५१ लाख एवढी आहे.

सुलतान मुरराहा जातीचा रेडा आहे. या रेड्याची किंमत ऐकून सर्व थक्क झाले आहे. महाराष्ट्र शासन आयोजित महा पशुधन एक्स्पो २०२३ मध्ये सुलतान याचा देशात द्वितीय क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. सुलतानचे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी त्याची खूप काळजी घेतली आहे.

असा आहे दररोज सुलतानचा आहारसुलतान याचा दररोजचा चारा ५ किलो ग्रॅम शेंगदाणा पेंड, १० लिटर दूध, अंडे, हिरवा चारा, उस, घास, मका आदी लागते. तर मुरराहा मादी दिवसाला २७ लिटर दूध देते. सुलतानचे वय ५ वर्ष ३ महिने आणि वजन ११०० किलो आहे.

लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस वेधले लक्षपशु प्रदर्शनी विविध जातीच्या म्हशी, गाई व वळू याप्रदर्शनी मध्ये मुख्य आकर्षण आहे. लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस, अतिशय सुंदर देखणे चपळ शर्यतीसाठी प्रसिद्ध असणारे पांढरा शुभ्र रंग अतिशय लांब धनुष्यबाणासारखे शिंग असलेली गायी व वळू प्रदर्शनीमध्ये मुख्य आकर्षण आहे.

३५ लिटर दूध देणारे होलस्टेन फ्रिसनधिपाड देहवृष्टीचे शेती काम व दुधासाठी प्रसिद्ध असलेली लातूरची देवणी गाय व वळू प्रदर्शनीमध्ये मनमोहन टाकते. ३० ते ३५ लिटर दूध देणाऱ्या होलस्टेन फ्रिसन व जर्सी संकरित गायी या पशु प्रदर्शनीमध्ये दूध उत्पादन स्पर्धेत सहभागी झाले आहे.उत्तर भारतातील राठी, साहिवाल,पाकिस्तान सीमेवरची चोलीस्तानी गाईची जात पाहायला मिळेल. लाल कंधारी, खिल्लार, देवणी, गवळावू जातिवंत व उच्च दर्जाचे प्रजनन क्षमता असलेले वळू या प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळेल.