शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

अमरावतीला ५१ स्वातंत्र्यवीरांनी भोगला होता कारावास; कारागृहात स्मृतींचे जतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 13:09 IST

स्वातंत्र्य दिन विशेष : माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, शिवाजीराव पटवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : देशाचा ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले.. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आजही भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत. येथील मध्यवर्ती कारागृहात १९३० ते १९४४ या काळात ५१ स्वातंत्र्य सेनानींनी कारावास भोगला. यात माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, शिवाजीराव पटवर्धन यांचाही समावेश होता.

ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वधर्मीयांनी लढा दिला. ९ ऑगस्ट १९४२च्या 'चलो जाव'च्या संदेशानंतर स्वातंत्र्यलढ्याचे रान पेटले. देशवासी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबले. ज्या तुरुंगात त्यांना कारावास भोगावा लागला, तेथील बराकीत आजही स्वातंत्र्याच्या लढ्याला उजाळा दिला जातो. अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक-दोन नव्हे, तर तब्बल ५१ जणांना कारावास झाला होता. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींचे जतन, संरक्षण कारागृह प्रशासन आजही करते. स्वातंत्र्य दिन, शहीद दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या स्मृतिस्थळाची पूजाअर्चा करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले जाते. १५ ऑगस्ट रोजी त्याअनुषंगाने कारागृह प्रशासनाची तयारी सुरु आहे.

या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश पल्लम राजू, के. आर. कारंथ, के. पी.एम. अग्नेश्वरिया, सी. एन. एम. मुदलियार, आर. नायडू, एम. अप्पलस्वामी, पी. गणपधीराव, के. कलेस्वामी राव, आर. सी. भारती, सी. चट्टेयार, के. के. रेड्डी, एम. बी. नायडू, एम. अनंतशध्यानम अय्यंगार, के. कलप्पा, के. ए. दामोदर मेनन, ए. कुप्परस्वामी मुदलियार, ए. पिल्लाई, एस. एस. कुलकर्णी, व्ही. व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, एस. सत्यमूर्ती, के. कामराज, एम. भक्तवत्सलम्, आर. राघवमेनन, व्ही. राघवैया, टी. विश्वनाथन, कला व्यंकटराव, पी. सीवरनानन, लक्ष्मीनारायण मालाणी, सीताराम जाजू, पार्वतीबाई पटवर्धन, रघुनाथमल कोचर, वीर वामनराव जोशी, यासह अन्य स्वातंत्र सैनिकांची नावे स्मृतिस्तंभावर कोरली आहेत.

"दरवर्षी दिन, औचित्य साधून येथे पूजाअर्चा करून स्मृती जागविल्या जातात. या बराकी स्वातंत्र्यलढ्यानिमित्त आजही 'जैसे थे' आहेत. बराकीचे नूतनीकरणाची कामे होत आहे."- कीर्ती चिंतामणी, अधीक्षक, अमरावती मध्यवर्ती कारागृह 

टॅग्स :Amravatiअमरावती