शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

८४ दिवसात ५०८ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:01 IST

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला अमरावती शहरातील हाथीपुरा भागात झाल्यानंतर ४३ दिवसांत १०० संक्रमित व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यानंतरच्या १३ दिवसांत आणखी १०० व्यक्ती आढळून आल्या. पुढील १२ दिवसांत १००, त्यानंतर आठ दिवसांत १०० व आताही आठ दिवसांत १०० संक्रमितांची नोंद होऊन कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पाचशेचा आकडा गाठला.

ठळक मुद्देशनिवारी २२ : इलाजाला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद; घातकपणा घटला, भय ओसरले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरासह जिल्हा ग्रामीणमध्ये १२० भागांत कोरोनाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यानंतरच्या ८४ दिवसांत ५०८ व्यक्ती संक्रमित झाल्या. शनिवारी पुन्हा २२ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे.जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला अमरावती शहरातील हाथीपुरा भागात झाल्यानंतर ४३ दिवसांत १०० संक्रमित व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यानंतरच्या १३ दिवसांत आणखी १०० व्यक्ती आढळून आल्या. पुढील १२ दिवसांत १००, त्यानंतर आठ दिवसांत १०० व आताही आठ दिवसांत १०० संक्रमितांची नोंद होऊन कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पाचशेचा आकडा गाठला.शनिवारी प्राप्त अहवालात २२ संक्रमित व्यक्तींची नोंद झाली. यामध्ये रहाटगाव येथील २६ वर्षाचा तरुण, जुन्या पॉवर हॉऊसजवळील अशोकनगरात १८ वर्षीय युवक, डेंटल कॉलेजजवळील मेहरबाबा कॉलनीत ३१ वर्षीय व्यक्ती, रुक्मिणीनगरात ३२ वर्षीय महिला, वलगाव येथे ३४ वर्षीय महिला, साबणपुऱ्यात ४० वर्षीय महिला, राजकमल चौकात ५२ वर्षीय महिला, गुलिस्तानगरात ५२ वर्षीय व्यक्ती, धरमकाटा परिसरात २६ वर्षीय महिला तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये मोर्शी तालुक्यात विचोरी येथे २७ वर्षीय तरुण, ५५ वर्षीय व्यक्ती, २४ वर्षीय महिला व रोहनखेड येथे २६ वर्षीय तरुण, अंजनगाव सुर्जी येथे ५२ वर्षीय पुरुष २० वर्षीय तरुणी तसेच कांडली (परतवाडा) येथे २३ वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ती सध्या अमरावतीला क्वारंटाईन आहे. याशिवाय शेगाव नाला परिसरात ३२ वर्षीय पुरुष तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट येथील ४४ व ४५ वर्षीय पुरुष येथील एका खासगी रुग्णालयात कोविड-१९ चा उपचार घेत आहेत. रात्री उशिरा चांदूर बाजार तालुक्यात नानोरी येथे ५५ वर्षीय पुरुष, पीडीएमसीत ३२ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.एका खासगी रुग्णालयात दाखल ७७ वर्षीय संक्रमित व्यक्तीचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या किन्नर समाजातील ४० वर्षीय व्यक्तीचा २५ जूनला मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २३ झालेली आहे.परदेशातून परतलेल्या दोन व्यक्ती संक्रमितआठवड्यात सहा नागरिक परदेशातून परतले. त्यांना येथील हॉटेलमधील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले. यापैकी दोन २० वर्षीय तरुणींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. दोन दिवसांत येथील पीडीएमसीमधील दोन डॉक्टर संक्रमित झाले आहेत. बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे. या व्यक्तींचा चार दिवसांनंतर स्वॅब घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या