शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक परिषदेसाठी ५०० न्यायाधीश येणार अमरावतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 20:32 IST

११ जानेवारी रोजी आयोजन : क्षमता निर्माण आणि मध्यस्थी क्रियाकलापांचे मूल्यांकनाचा विषय

अमरावती : ‘क्षमता निर्माण आणि मध्यस्थीच्या क्रियाकलापांचे मूल्याकंन’ या विषयावर प्रादेशिक परिषदेचे आयोजन ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अमरावती येथील हॉटेल ग्रँड महफीलमध्ये करण्यात आले आहे. या प्रादेशिक परिषदेला विदर्भातील ११ जिल्ह्यांतून सुमारे ५०० न्यायाधीश, ५० प्रशिक्षित मध्यस्थ अधिवक्ता उपस्थित राहतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाजोग यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रादेशिक परिषद पार पडणार आहे. 

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुख्य मध्यस्थ केंद्र आणि अमरावती येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयातून आयोजित या प्रादेशिक परिषदेत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थ सनियंत्रण समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी, समितीचे सदस्य न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तसेच अमरावती जिल्हा पालक न्यायमूर्ती एस.बी. शुक्रे, नागपूर खंडपीठाच्या मुख्य मध्यस्थ सनियंत्रण उप-समितीचे सदस्य न्यायमूर्ती झेड.ए.हक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

वैकल्पिक वाद निवारणाची एक परिणामकारक पद्धत म्हणजे मध्यस्थी. मध्यस्थीचे फायदे, मध्यस्थ व्यक्तीचे अनुभव, मध्यस्थी प्रक्रिया राबविताना येणाºया समस्या आणि त्यावरील उपाययोजना या विषयांवर आधारीत ही परिषद चार सत्रांमध्ये होणार आहे. प्रादेशिक स्तरावर आयोजित मध्यस्थ परिषदेची पूर्वतयारी मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.  ‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ या शीर्षकाला सार्थ करण्यासाठी वैकल्पिक वाद निवारणाची परिणामकारक पद्धत मध्यस्थी तसेच क्षमता निर्माण आणि मध्यस्थीच्या क्रियाकलापांचे मूल्यांकन या उद्दिष्टाने या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अमरावती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.जी. संतानी यांनी दिली. यांचे मार्गदर्शन लाभणार चार सत्रातील या परिषदेत मध्यस्थीसंदर्भातील विविध विषयांवर न्यायमूर्ती रणजित मोरे, न्या. आर.के. देशपांडे, न्या. एस.बी. शुक्रे, न्या. झेड.ए. हक हे उपस्थित न्यायाधीश आणि अधिवक्ता यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मीला एस. जोशी (फलके) यांनी दिली. 

टॅग्स :Courtन्यायालय