शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ५० रुपये; तलाठी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:28 IST

Amravati : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, गुन्हे दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला देण्याकरिता प्रत्येक ५० रुपये मागणाऱ्या सावंगी येथील तलाठ्याला अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. या प्रकरणात निलंबनाची कारवाई ही राज्यातील बहुधा पहिलीच आहे.

योजनेच्या कागदपत्राकरिता १ जुलैपासून महिलांची गर्दी ओसंडून वाहू लागली. त्याचा फायदा सावंगी येथील तलाठी तुळशीराम महादेव कंठाळे (५५) याने प्रत्येकी ५० रुपये घेऊन उत्पन्नाचा दाखला दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तत्काळ तहसीलदारांना अहवाल मागितला. मंगळवारी दुपारी पत्र परिषद घेऊन तडकाफडकी निलंबित करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

तुळशीराम कंठाळे हा महिलांकडून उत्पन्नाच्या दाखल्याचे ५० रुपये घेत असल्याचा व्हिडीओ एका जागरूक तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केला. पुसला मंडळ अधिकारी संजय मिराशे यांच्याकडून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती. निलंबित तलाठी कंठाळे यांना धारणी तहसील कार्यालय मुख्यालयी जाण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी तीन निलंबन अन् १६ कारणे दाखवा नोटीसतुळशीराम कंठाळे वादग्रस्त तलाठी असून यापूर्वी अंजनगाव सुर्जी, वरूड आणि मोर्शी येथून निलंबित झाले होते. याशिवाय नागरिकांच्या तक्रारीवरून तहसील कार्यालयाकडून १६ वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेकरिता तलाठी किंवा दलाल आर्थिक पिळवणूक करीत असतील, तर तत्काळ तहसील कार्यालयात माहिती द्यावी. सेतू केंद्रावर शासकीय दराप्रमाणे पैसे द्यावे.- पंकज चव्हाण, प्रभारी तहसीलदार, वरूड 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती