शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पेसा क्षेत्रातील आदिवासींचे ५० टक्के आरक्षण धोक्यात? ट्रायबल फोरमची उच्च न्यायालयात धाव

By गणेश वासनिक | Updated: September 10, 2022 15:20 IST

कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याबाबत याचिका

अमरावती : अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत आदिवासींसाठी पेसा कायदा १९९६ च्या ४ (छ) आणि संविधानातील तरतुदींनुसार आदिवासी सदस्यांच्या किमान ५० टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ट्रायबल फोरमने याचिका दाखल करुन न्यायासाठी धाव घेतली आहे.संविधानातील पाचव्या अनुसूचीनुसार राज्यातील १३ जिल्हे २३ तालुके पूर्णतः आणि ३६ तालुके अंशतः राष्ट्रपतींनी २ डिसेंबर १९८५ रोजी घोषित केलेल्या अनुसूचित क्षेत्रात येतात. पंचायत संबंधी तरतुदी संविधान ( ७३ वी सुधारणा) अधिनियम १९९२ संविधानात समाविष्ट केलेल्या आहेत. पेसा कायदा १९९६ च्या पॅरा ३ आणि ४ नुसार संविधानात काहीही असले तरी पंचायती संबंधी पेसा कायद्यातील तरतुदींशी विसंगत कायदा करता येत नाही. एखाद्या पूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील पंचायतीमध्ये ५० टक्के पेक्षा कमी अनुसूचित जमातींची लोकसंख्या असेल तरी त्या पंचायतीमध्ये ५० टक्के सदस्य आदिवासी असतील. तसेच पंचायतीमध्ये सरपंच, सभापती किंवा अध्यक्ष आदिवासी असतील, अशी नियमावली आहे.

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या राखीव व खुल्या पदांच्या जागा राज्य निवडणूक कार्यक्रमानुसार अनुसूचित क्षेत्रातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी लोकप्रतिनिधींची पदे चक्रानुक्रमे (रोटेशन) पद्धतीने आरक्षण सोडत काढतात. या पद्धतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पारित झालेल्या पेसा कायद्याच्या कलम ४ (जी) च्या परन्तुकाच्या तरतुदींचे उल्लंघन होते. त्यामुळे प्रभाग, गण किंवा गटात रोटेशन पद्धत न ठेवता त्या जागा आदिवासींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव ठेवून बिगर अनुसूचित क्षेत्रात फिरते आरक्षण आळीपाळीने आरक्षित ठेवण्यात यावे. ग्रामपंचायत अधिनियम १९५८, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ हे संसदेने पारित केलेल्या पेसा कायद्याला वरचढ ठरत नाहीत, असे मुद्दे याचिका कर्त्यातर्फे ॲड. शौनक कोठेकर यांनी न्यायालयात मांडले आहेत. उच्च न्यायालयाचे वेधले लक्ष 

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ चे निवडणुका संबंधीचे कलम १२(२) (सी) संबंधात तसेच संविधान अनुच्छेद २४३ डी, २४३ टी, १४ आणि १६ नुसार निर्णय दिल्यामुळे संविधान भाग ९ आणि संविधान भाग ९ (क) मधील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण पुनर्विलोकन करणे आवश्यक असल्याचे याचिकेद्वारे लक्ष वेधले आहे.राष्ट्रपतींनी अनुसूचित क्षेत्राची घोषणा करुन ३६ वर्षे झाली. तरिही राज्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी नाही. याबाबत राज्य सरकारला पेसा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण व रोटेशन पद्धत थांबविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु समाधानकारक उत्तर व न्याय न मिळाल्यामुळे आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

 - अंकित नैताम, जिल्हा उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम यवतमाळ

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावतीGovernmentसरकार