जिल़्हा परिषद : समाज कल्याण समितीत ठराव पारितलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अंपगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के राखीव निधी असतो. यामधून अंपगांना व्यवसायासाठी अंपगांना ५० टक्के रक्कम अग्रिम देण्याचा निर्णय बुधवारी समाज कल्याण समितीने घेतला आहे. समाज कल्याण समितीची मासिक सभा ५ जुलै रोजी विविध विषयाला अनुसरून सभापती सुशीला कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. सदस्यांनी समाज कल्याणमार्फत अंपगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीची रक्कम ही व्यवसाय सुरू केल्यानंतर देण्यात येत होता. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अंपग बांधव कुठलाही व्यवसाय पैशा अभावी करू शकत नव्हते. त्यामुळे अंपगांना यापुढे राखीव निधीतील ५० टक्के रक्कम ही अग्रिम स्वरूपात देण्यात यावी व उर्वरित रक्कम ही त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याची पडताळणी करून अदा करावी, असा ठराव एकमताने पारीत केला आहे. सभेला सभापती सुशीला कुकडे, सदस्य पूजा येवले, सुनंदा काकड,शारदा पवार, सीमा सोरगे, रंजना गवई, अनिता अडमाते, अर्चना वेरूळकर, देवेंद्र पेठकर, प्रवीण तायडे, गजानन राठोड, शरद मोहोड, समाज कल्याण अधिकारी मिना अंबाडेकर, अधीक्षक विजय मडावी, सोनाली मोहोड आदी अधिकारी उपस्थित होते.
अंपगांना मिळणार ५० टक्के निधी अग्रीम
By admin | Updated: July 6, 2017 00:15 IST