शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

पाच लाख क्विंटल तूर बाकी

By admin | Updated: June 6, 2017 00:10 IST

तूर खरेदी केंद्रांना शासनाने १० जूनपर्यत मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवर डीएमओव्दारा तूर खरेदी सुरू करण्यात आली.

शेडबाहेरील तुरीची खरेदी : २३,३१२ शेतकऱ्यांना टोकनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तूर खरेदी केंद्रांना शासनाने १० जूनपर्यत मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवर डीएमओव्दारा तूर खरेदी सुरू करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार सध्या बाजार समितीच्या आवारात परंतु उघड्यावर असलेल्या तुरीची खरेदी व मोजणी सुरू आहे. त्यानंतर टोकन दिलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या घरी असलेली तूर यार्डात बोलावण्यात येऊन खरेदी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत २३, ३९४ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांची पाच लाख सात हजार बारा व्किंटल तुरीची खरेदी बाकी आहे.यापूर्वी सुरू असलेल्या केंद्रांची मुदत ३१ मे रोजी संपल्याने तूर खरेदी बंद होती. मात्र राज्य शासनाचे विनंतीवरून केंद्र शासनाने पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवरील तूर खरेदी सुरू होती. मात्र रविवारी मोर्शी व अंजनगाव सुर्जी केंद्रात उघड्यावर ठेवण्यात आलेली तूर खरेदी झाल्याने येथील खरेदी बंद होती.शासनाचे आदेशानुसार बाजार समिती आवारातील तूर खरेदी प्रथम करण्यात येणार आहे.व या खरेदी तुरीची उचल करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची घरी असलेली तूर खरेदी करण्याचे आदले दिवसी बाजार समितीव्दारा फोन करण्यात येणार आहे. व नंतर ही तूर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख यांनी दिली.राज्य शासनाची बाजार हस्तक्षेप योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच २७ एप्रिल पासून आतापर्यत पाच लाख ७९१ शेतकऱ्यांची १२ हजार ४४३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच रविवारी ७११ शेतकऱ्यांची ९३ हजार ३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीत टिनशेड नसल्यामुळे व सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याने तूर पावसात ओली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.खरेदी, मोजणीसाठी शिल्लक तूरजिल्ह्यात सद्यस्थितीत २३,३९४ शेतकऱ्यांची पाच लाख सात हजार १२ व्किंटल तूर खरेदी बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर २,०६४ शेतकऱ्यांची ४३ हजार ३८५, अमरावती केंद्रावर ४,३८८ केंद्रावर १,२३,३०७, अंजनगाव सुर्जी केंद्रावर २,४४८ शेतकऱ्यांची ४०,८६३, चांदूर बाजार केंद्रावर १,४८३ शेतकऱ्यांची २७,९८६, चांदूर रेल्वे केंद्रावर १,७८५ शेतकऱ्यांची ३४,३०२, दर्यापूर केंद्रावर ३,१५५ शेतकऱ्यांची ८३,००१, धामणगाव केंद्रावर १,४०१ शेतकऱ्यांची २६,२२६,धारणी केंद्रावर १०५ शेतकऱ्यांची १,४०६,मोर्शी केंद्रावर २,१९१ शेतकऱ्यांची ४४,३१८, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २,३१७ शेतकऱ्यांची २,३१७ शेतकऱ्यांची ४४,९९६ व वरूड केंद्रावर ८६६ शेतकऱ्यांची १३,५४४ व्किंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.