सहकार विभागाचा अहवाल : २०३४ ठेवीदारांना १७५ कोेटी रक्कम देय अमरावती : जिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यापैकी २०३४ ठेवीदारांना १७५ कोटी ३० लाखांची रक्कम देय आहे. तर ९६२ कर्जदारांकडून २०२ कोटी ११ लाखांचे कर्ज येणे असल्याचा सहकार विभागाचा अहवाल आहे.अचलपूर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक ४ नोव्हेंबर २००८ मध्ये अवसायनात काढण्यात आली. त्यावेळी ८५७ कोटी १३ लाखांच्या ठेवी होत्या. यामध्ये एक लाखाच्या आतील ४४२८ ग्राहकांच्या ५३० कोटी ८२ लाखांच्या ठेवी आहेत. एक लाखांवरील २१५ ग्राहकांच्या ३२६ कोटी ३१ लाखांच्या ठेवी आहेत. तसेच अवसायन तारखेस ८८६ कोटी ६२ लाखांचे कर्ज येणे बाकी असल्याचे अहवालात नमूद आहे. यापैकी सप्टेंबर २०१६ अखेर डीआयसीजीसीद्वारे मंजूर ५३० कोटी ८२ लाखांच्या रकमेपैकी ४८७ कोटी ८६ लाखांची रक्कम वितरित करण्यात आली. अवसायन दिनांकापासून १८१ कोटी ३३ लाखांची वसुली करण्यात आली. अडचणीत आलेल्या एकूण दोन संस्था आदेशित करण्यात येऊन ६१ कोटी ५५ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यापैकी तीन पतसंस्थांशी संबंधित ५७ व्यक्तींवर गुन्हे नोंदविले आहेत. ३१ मार्च २०१६ अखेर ३९६ कर्जदारांकडून ३४कोटी ४७ लाखांची वसुली करण्यात आली तर ९६२ कर्जदारांकडून २०२ कोटी ११ लाखांचे कर्ज येणे शिल्लक आहे. यामुळे या संस्था अडचणीत आल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन संस्थांकडे ६१.५५ लाखांची जबाबदारी निश्चितअडचणीतील पतसंस्थांपैकी कलम ८८ अन्वये दोन संस्थांकडे ६१ कोटी ५५ लाखांची शिल्लक वसुलपात्र रक्कम आहे. यामध्ये शेंदुरजनाघाट येथील लोकसेवा नागरी सहकारी संस्थेची चौकशी पूर्ण झाली. यामध्ये सात व्यक्तींवर १३ कोटी १६ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. वरुड येथील अर्बन क्रेडीट को आॅपरेटिव्ह संस्थांमधील ३ व्यक्तींवर ४८ कोटी ३९ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. वरुडच्या समृद्धी पतसंस्थेचा अहवाल निरंक आहे. शासनाच्या अर्थसहाय्यापैकी ८.१७ लाखांची वसुली बाकीशासनाने यातीन संस्थांना २०० कोटी बिनव्याजी अर्थसहाय्य केले होते. यापैकी ४५.२३ लाखांचे अर्थसहाय्य ठेवीदारांना वाटप करण्यात आले. शासनाने संस्थेला दिलेल्या अर्थसहाय्यापैकी ८ कोटी १७ लाखांची वसुली फेब्रुवारी २०१७ अखेर व्हावयाची आहे. वसूल करायची एकूण रक्कम ३७ कोटी ६ लाख रुपये आहे. तीन संस्था अवसायनात, ५७ व्यक्तींवर गुन्हे दाखलजिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आहेत. त्यापैकी वरुड तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. येथे सन २०१६ अखेर या तीन्ही पतसंस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत व ५७ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. हीप्रकरणे दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. यासंस्थांची नोंदणी रद्द करून त्या अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
४६९ पतसंस्था अडचणीत
By admin | Updated: March 28, 2017 00:04 IST