शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नऊ वर्षांत ४५ हजार व्यावसायिकांकडे २५४ कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:36 IST

पीएम मुद्रा लोन योजना : व्यवसाय सुरू पण किस्त भरण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासनाने एखादी योजना आणली की तिचा फायदा घेण्यापेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. शासन आज ना उद्या कर्ज माफ करेल, या उद्देशाने कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेलाही याचा फटका बसला आहे.

या योजनेत जिल्ह्यात शिशू, किशोर व तरुण अशा एकूण ४४,९९१ खातेदारांनी २५४.२५ कोटींचे कर्ज घेतले, उद्योग उभारले. मात्र, वेळेवर किस्त भरणा होत नसल्याचे दिसून येते. ६ एप्रिल २०१५ रोजी या योजनेचा शुभारंभ झाला होता. या योजनेद्वारे सूक्ष्म व लहान व्यवसायांना १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. याला मुद्रा कर्ज म्हणतात. या योजनेसाठी तारण घेतले जात नाही. सर्वांनी व्यवसाय उभारावे व स्वतःची उन्नती साधावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे.

मुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही.

या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे.

मुद्रा योजनेचे कर्ज तीनशिशू कर्ज: मुद्रा योजनेत छोट्या व्यावसायिकाला मोठे करण्यासाठी ५० हजारांचे कर्ज देण्याची तरतूद आहे. ३२४९२ खातेदारांना नऊ वर्षात ११०.२७ कोटींचे कर्ज दिले आहे.

किशोर कर्ज : व्यवसायाला उभारी देताना ५१ हजार ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज बँकांद्वारा देण्यात येते. जिल्ह्यात या प्रकारात १२०६८ खातेदारांना १०९.८५ कोटींचे कर्ज दिले आहे.

तरुण कर्ज : मुद्रा लोन योजनेत पाच ते १० लाखांपर्यंत कर्ज बँकांद्वारा दिले जाते. ४३१ तरुणांनी ३४.१२ कोटींचे कर्ज बँकांद्वारा घेतले आहे. अनेक जण किस्त वेळेवर भरला जात नाही.

२५४ कोटींचे वाटपया योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे गहाणखत घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ४४९९१ खातेदारांनी आतापर्यंत म्हणजेच नऊ वर्षांत २५४.२५ कोटींचे कर्ज मुद्रा योजनेत घेतले आहे. बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस दिल्यास खातेदारांकडून सहकार्य मिळत नाही.

थकबाकी वाढली, बँकांसमोर आव्हानप्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यात ४४,९९१ खातेदारांना २५४.२५ कोटींचे कर्ज दिले आहे. मात्र, या खातेदारांकडून कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले जात नाहीत. त्यामुळे हे कर्ज कसे वसूल करावे, हा प्रश्न विविध बँकांसमोर आहे.

काही खातेदारांद्वारा नियमित भरणामुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही. या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती