शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
4
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
5
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
6
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
7
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
8
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
9
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
10
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
11
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
12
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
13
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
14
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
15
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
16
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
17
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
18
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
19
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 

४३ ग्रामपंचायतींना दलित वस्ती विकासासाठी वाटा

By admin | Updated: May 18, 2015 00:09 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींकरिता दलित वस्तीचा विकास ....

शासनाचे अनुदान : विकासाला मिळणार चालना अमरावती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींकरिता दलित वस्तीचा विकास करण्यासाठी १४ मे रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सुमारे १ कोटी ५१ लाख रूपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. यामुळे वरील ग्रामपंचायतीमधील दलित वस्तीतील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत.सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करण्यासाठी योजना राबविण्यात येते. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासन निधी उपलब्ध करून देते. मात्र त्याशिवाय या वस्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने यंदाही राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यासाठी सुमारे १ कोटी ५१ लाख रूपयांचा विशेष निधी मंजूर करून तो जिल्हा परिषद वित्त विभागाला उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाने दलित वस्ती विकासासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत विशेष निधीसाठी सुमारे १ कोटी ९६ लाख रूपयांचा प्रस्ताव सादर केला होता. यापैकी राज्य शासनाने सुमारे दीड कोटी रूपये मंजूर केले आहे. या निधीमुळे विकासकामांना चालणार मिळणार आहे. प्राप्त निधीतून संबंधित ४३ ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी प्राप्त प्रस्तावानुसार निधीचे वितरण केले जाणार आहे. सदर निधीतून रस्ता काँक्रीटीकरण, सभागृह, वालकंपाऊड, सौंदर्यीकरण, समाज मंदिर, स्मशानभूमीचा रस्ता आदी विकासकामे केली जाणार आहेत.या ग्रामपंचातींचा आहे समावेशराज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून ग्रामपंचायतींचा विकास होणार आहे. यामध्ये अचलपूरमधील कोल्हा, रासेगाव, येसुर्णा, मल्हारा, भुरडघाट, गौरखेडा, सावळी दातोरा, दर्यापूर तालुक्यातील खल्लार, कळाशी, भामोद, येवदा, वडनेर गंगाई, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कमालपूर, निमखेडबाजार, मुऱ्हा, पांढरी, कसबेगव्हाण, धारणी तालुक्यातील धारर्णी, सालई, गोडवाडी, धाराकोट, बैरागड, आकी, चिखलदरा तालुक्यातील सिमोरी, भंडोरा, चुर्णी, पलस्या, दहिंद्री, गांगरखेडा, काटकुंभ, वरूड तालुक्यातील आमनेर, खानापूर मेंढी, रोशनखेडा, सावंगी बेल, शहापूर, वघाळ, वाडेगाव, तिवसा घाट, मोर्शी तालुक्यातील आष्टगाव, खेड, भातकुली तालुक्यातील बुधागड, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील खिरसाणा या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने सुमारे १ कोटी ९६ लाख रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विशेष निधीसाठी पाठविला होता. त्यापैकी जवळपास दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे दलित वस्तीमधील विकासकामांना चालना मिळणार आहे.- सरिता मकेश्र्वर, सभापती समाजकल्याण समिती जिल्हा परिषद.सामाजिक न्याय विभागाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला विशेष सहाय्य निधी ग्रामपंचायतनिहाय सुमारे १ कोटी ५१ लाख रूपये उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबत लेखी पत्रसुद्धा प्राप्त झाले आहे.- भाऊराव चव्हाण,समाजकल्याण अधिकारी, जि.प.