शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

रस्ते दुरुस्ती; मागितले ४०८ अन् २८ कोटींवर भलामण

By जितेंद्र दखने | Updated: July 12, 2023 19:33 IST

सांगा, ग्रामीण भागाचे चित्र पालटणार तरी कसे? : निधी वाढविण्याऐवजी केला कमी

जितेंद्र दखने, अमरावती : मिनीमंत्रालयाच्या अखत्यारीतील सहा हजार किमी लांबीच्या रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे ४०८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली खरी; पण फक्त २८ कोटींवर भलामण करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे, एवढ्या तोकड्या निधीत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी तरी कशी, असा प्रश्न खुद्द जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यापुढे उभा ठाकला आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता लेखाशीर्ष ३०५४-२०१६ ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबूतीकरणासाठी २६.४९ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे लेखाशीर्ष ५०५४-४१५७ इतर जिल्हा मार्गाचा विकास व मजबुतीकरणासाठी २१ कोटीचा नियतव्यय मंजूर होता. यंदा मात्र केवळ १४ कोटी रुपयांनाच मंजुरी देण्यात आल्याने ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा दावा सपशेल खोटा ठरला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतर जिल्हा मार्गाचा विकास व मजबुतीकरणासाठी १४ कोटी नियतव्यय मंजूर केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लेखाशीर्ष अंतर्गत नियतव्ययामध्ये वाढ होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तो कमी करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाच्या तुलनेत जिल्हा परिषदेकडे रस्त्याची लांबी सर्वाधिक आहे. असे असताना या रस्त्याची दरवर्षी सुधारणा करण्याचे अनुषंगाने बांधकाम विभागाकडून आराखडा तयार केला जातो. या आराखड्यानुसार दरवर्षी सीएसआर नुसार किमान १० टक्के वाढ होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नैसर्गिक न्यायाच्या तुलनेत डीपीसीकडून निधी देण्याच्या बाबत आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खराब रस्त्याचे चित्र ३७० कोटी डिमांड पैकी केवळ १४ कोटी सुधारणा तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.४०८ कोटींचा खर्च अपेक्षित

जिल्हा परिषदेकडील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या एकूण लांबीच्या २० टक्के लांबीचे दरवर्षी नूतनीकरण, मजबुतीकरण, सुधारणा होणे अपेक्षित आहे.या अनुषंगाने ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणांकरिता सद्यस्थितीत ३७० कोटी, तर इतर जिल्हा मार्गाकरिता ३८ कोटी असा एकूण ४०८ कोटीचा खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्षात दोन्ही मिळून २८ कोटींवर बोळवण केली.डीपीसीकडे एकूण ४०८ कोटींचा प्रस्ताव दिला. त्यात मंजूर नियतव्यय कमी मिळाला आहे. तो वाढवून मिळावा, याकरिता जिल्हा प्रशासनाकडे ॲडिशनल सीईओंच्या मार्गदर्शनात प्रस्ताव सादर केला आहे. - दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग जि.प.अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीroad transportरस्ते वाहतूक