शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील कुहृयाच्या बालाजी नवरात्र उत्सवाला ४०० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 11:06 IST

तिरुपती बालाजीचे प्रतीक असलेले तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील श्री लहान बालाजी देवस्थान व मोठे बालाजी देवस्थानात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देनिजामशाहीत मंदिराची पायाभरणी विविध वाहनांची दहा दिवस मिरवणूक

रितेश नारळे/अमरावती : तिरुपती बालाजीचे प्रतीक असलेले तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील श्री लहान बालाजी देवस्थान व मोठे बालाजी देवस्थानात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. नवरात्राच्या दहा दिवसांत रोज रात्री बालाजीच्या विविध वाहनांची गावातून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा येथे ४०० वर्षांपासून जपलेली आहे.सुमारे ४०० वर्षांपूर्वी तत्कालीन वऱ्हाड प्रांतात निजामशाहीमध्ये कुऱ्हा येथील मंदिराची उभारणी झाली. तेलंगणातून आलेल्या तेलंगी ब्राम्हणांनी तिरुपतीवरून आणलेल्या पंचधातूच्या मूर्ती कुऱ्हा येथील गोविंद सोनार यांच्याकडे ठेवल्या. नंतर त्यांच्या घरातच लहान बालाजी देवस्थान अस्तित्वात आले. निजामशाही संपुष्टात आल्यानंतर भोसले घराण्याचे पंतसचिव आप्पाजी देशमुख यांना हे देवस्थान सोपविण्यात आले. तेव्हापासून देशमुख घराण्याचे वंशजच देवालयाचा कारभार सांभाळत आहेत. मंदिरात बालाजीची सुंदर प्राचीन मूर्ती मधोमध उभी आहे. सोबतच पुरातन विठ्ठल रुख्मिणी मूर्ती आणि गजानन महाराजदेखील आहेत.या उत्सवात बालाजीच्या वाहनांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. नाग, चक्र, मोर, वाघ, गरुड, हनुमान, पाळणा, घोडा, पालखी, हत्ती अशा क्रमाने वाहनांची मिरवणूक वारकरी मंडळी रात्री ९ ते १०.३० अशी काढतात. महिला वाहनांची पूजाअर्चा करतात आणि साखरपोह्याचा प्रसाद देतात. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पालखीचा मान असतो. तिचे सीमोल्लंघन करून गावात परत आणतात. गावातील लोक प्रथम पालखीला सोन्याची पाने वाहतात त्यानंतर एकमेकांना सोने देतात. दसऱ्हाच्या दुसऱ्हा दिवशी समारोपाला सकाळी हत्तीचे वाहन निघते. यावर बालाजी विराजमान होऊन राजाच्या रूपात लोकांच्या घरापर्यंत येत असल्यामुळे गावातील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.प्राचीन काळी बालाजी मंदिर दगडी होते. देवस्थानची संपत्ती व लोकवर्गणीतून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. पुरातन असूनही शासनाने या मंदिराला हेरिटेजचा दर्जा दिला नाही. लोकवर्गणीतून कारभार चालतो. मोठ्या बालाजी देवस्थानचे अध्यक्ष दिलीप डांगे व श्री लहान बालाजी मंदिराचा कारभार देशमुखांचे वंशज संस्थांचे अध्यक्ष विजय देशमुख, व विश्वस्त सुधाकर देशमुख, सुरेश मुळे, दत्तुजी भुरले, रमेश देशमुख, प्रवीण देशमुख सांभाळत आहेत.बालाजी नवरात्र उत्सव दहा दिवस चालतो. इतकी प्राचीन परंपरा राबविणारे हे एकमेव देवस्थान आहे. हत्ती वाहनाच्या दिवशी बालाजीचे दर्शन घेण्यासाठी बाहेरगावाहून मंडळी येथे येतात. विजय देशमुख, अध्यक्ष, लहान बालाजी देवस्थान, कुऱ्हा.

टॅग्स :Navratriनवरात्री