शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:45 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

ठळक मुद्देयंदा मान्सूनच्या पावसाचे आगमन लवकर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

संदीप मानकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती:  पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा १ जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहचला आणि स्थिरस्थावर झाला. त्या कारणाने यंदा विदर्भातही १० जूननंतर दमदार पावसाची आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ४८.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३०.०२ टक्के, अरुणावती सर्वात कमी ९.७८ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ४०.०५ टक्के, वान ४४.५५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४९.३९ टक्के, पेनटाकळी ४१.८२ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात १६.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ५६५.१८ दलघमी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.२४ मध्यम प्रकल्पांत फक्त ३५ टक्केच पाणीसाठामोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी फक्त ३५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु पावसाळा दोन आठवड्यावर येऊन ठेपल्याने यंदा प्रकल्प पुन्हा शंभर टक्के भरतील अशी अपेक्षा आहे. गत वर्षी बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्याकारणाने प्रकल्पातून रबीला सिंचनाकरिता पाणी देता आले. ४७७ लघु प्रकल्पांत मात्र २०.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून पाचही जिल्ह्यांतील एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी ३२.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद सिंचन विभागाने घेतली आहे.

टॅग्स :Waterपाणी