शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

⁠⁠⁠⁠⁠‘डीबीटी’ची ४० टक्के रक्कम खात्यात होणार जमा; आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा, साहित्य खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:35 IST

 राज्य शासनाच्या आदिवासी विकास योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्य, वस्तू खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत उर्वरित ४० टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश धडकले आहेत.  

अमरावती, दि. 11 -  राज्य शासनाच्या आदिवासी विकास योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्य, वस्तू खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत उर्वरित ४० टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश धडकले आहेत.  अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सुमारे २५ हजार १०५ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना यापूर्वी दैनंदिन वापरासाठी साहित्य, वस्तुंचा पुरवठा केला जात होता. मात्र, साहित्यवाटपात गैरप्रकार, अपहाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने ‘डीबीटी’अंतर्गत थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेणा-या आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात साहित्यखरेदीसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभीच ६० टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. आता तीन महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये उर्वरित ४० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात वळती करण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्तांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केले आहेत. ही रक्कम देण्यापूर्वी याआधी दिलेल्या रकमेतून विद्यार्थ्यांनी साहित्य खरेदी केले अथवा नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचना प्रकल्प अधिका-यांना दिल्या आहेत. धारणी, अकोला, पांढरकवडा, किनवट, नांदेड, औरंगाबाद व कळमनुरी या सात प्रकल्प कार्यालयस्तरावर शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

अनुदानित आश्रमशाळांचा निधी संस्थेकडे जमा...आदिवासी विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीसाठी वर्षाकाठी लागणारी रक्कम शासन संस्थेच्या नावे निर्गमित करीत असल्याची माहिती आहे. त्यानुसार अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत ४१,९६१ विद्यार्थ्यांची रक्कम संस्थेकडे जमा करण्यात आली आहे. प्रतीविद्यार्थी वर्षाकाठी ९ हजार रुपये जमा केले जात असल्याची माहिती आहे.

या साहित्यासाठी दिली जाते रक्कम... वसतिगृह, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराचे साहित्य, वस्तू खरेदीसाठी शासनाकडून पैसे दिले जातात. यात किराणा वगळता साबण, खोबरेल तेल, कंगवा, पायमोजे, टुथपेस्ट, मंजन, नोटबूक, रजिस्टर, शालेय साहित्य आदींचा समावेश आहे.

‘‘आदिवासी विकास आयुक्तांच्या आदेशानुसार ‘डीबीटी’अंतर्गत ४० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा केली जाईल. यापूर्वी दिलेल्या ६० टक्के रकमेतून विद्यार्थ्यांनी साहित्य खरेदी केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.- गिरीश सरोदे,अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :Studentविद्यार्थी