शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

१०० दिवसांत रबीचे चार टक्केच कर्जवाटप; पश्चिम विदर्भाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 16:48 IST

यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले.

अमरावती : यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणविणा-या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेचे वाशीम वगळता चार जिल्ह्यांत रबीचे कर्जवाटप निरंक आहे. शेतमालास किमान हमीभावही नाही अन्  हंगामासाठी कर्जवाटपही नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाल्याचा थेट परिणाम रबी हंगामावर झाला. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा अमरावती विभागातील रबीचे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र नापेर राहिले. ज्या शेतक-यांजवळ संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, त्यांनादेखील बँका कर्ज नाकारत असल्याचे चित्र दुर्देवी आहे. अमरावती विभागात यंदाच्या रबी हंगामासाठी बँकांना ६९७ कोटी ९९ लाखांचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. त्या तुलनेत आतापर्यंत बँकांनी फक्त २,८९२ शेतक-यांना २९ कोटी ८६ लाखांचे कर्जवाटप केले, याची टक्केवारी केवळ ४ एवढी आहे.जिल्हा बँकांना यंदा १९० कोटी ५३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त ५५० शेतक-यांना एक कोटी ४९ लाख ९२ हजारांचे कर्जवाटप केले. ही ०.७९ टक्केवारी आहे. शेतक-यांची म्हणविणारी जिल्हा बँक शेतक-यांनाच कशी नाडवते, हे त्याचे उदाहरण आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ४७० कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,१४३ शेतक-यांना ११ कोटी ६६ लाखांचे वाटप केले, तर ग्रामीण बँकांना ३४ कोटी ४३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त वाशिम जिल्ह्यात ८८ शेतक-यांना ६२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. शेतकरी बँकाचे उबंरठे झिजवीत असताना बँका कर्ज नाकारत असल्याची विभागाची शोकांतिका आहे.२.३० लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेतशासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. यासाठी विभागातील  नऊ लाख ७२ हजार १३७ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्या तुलनेत आतापर्यत जाहीर १३ ग्रीन लिस्ट मध्ये सात लाख ४१ हजार ६०२ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. यामध्ये जिल्हा बँकेच्या तीन लाख ९५ हजार ९१८ शेतकºयांचे १,७५८ कोटी ३६ लाखांचे तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या तीन लाख ४५ हजार ९८४ शेतक-यांचे १९९६ कोटी २५ लाखांचे कर्ज माफ झाले. अद्याप दोन लाख ३० हजार ५३५ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी