शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

३,७७८ उमेदवार अपात्र!; निवडणूक खर्च, जातवैधता प्रमाणपत्र सादर नाही

By admin | Updated: February 16, 2016 23:57 IST

जिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे ..

गजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे व विजयी उमेदवारांनी सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, अशा ३ हजार ७७८ उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाकडे विहित मुदतीत हे सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमान्वये अपात्रतेची कारवाई होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा, खर्च सादर करण्याचा कालावधी आणि पद्धतीचा वापर केला जातो. आयोगाच्या ७ फेब्रुवारी १९९५ च्या आदेशांनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा ग्रापंच्या उमेदवारांना पाच वर्षांकरिता अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. ही कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना ५ जून २०१० व १९ नोव्हेंबर २०१० च्या आदेशाप्रमाणे सक्षम अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाने प्रदान केले आहेत.प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखलअमरावती : जिल्ह्यात मागील वर्षी ५५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व १९६ पोटनिवडणुका पार पडल्यात. यामध्ये १० हजार ८३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली. यापैकी ८ हजार ७३ उमेदवारांनी निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर केला. मात्र, २ हजार ७५९ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम व आयोगाच्या आदेशान्वये अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक प्रकरणेजातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांची सर्वाधिक १६८ संख्या नांदगाव तालुक्यातील आहे. वरुड १३२, मोर्शी १०७, धामणगाव १४७, अमरावती २७, भातकुली २१, चांदूररेल्वे ५९, तिवसा १२, मोर्शी ४६, अचलपूर ७, दर्यापूर २९८, अंजनगाव ४९, चिखलदरा १२ व धारणी येथील ५५ अशी उमेदवारांची संख्या आहे. खर्च सादर नसलेल्या प्रकरणांची सद्यस्थिती मे ते जुलै २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या ५८१ ग्रा.पं.च्या निवडणुकीत २ हजार ६०२ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या १११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १३३ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मुदती संपणाऱ्या ५८ ग्रा. पं. च्या निवडणूकीत २४ उमेदवारांनी अद्याप खर्च सादर केला नाही.८ तालुक्यातील १,४७२ प्रकरणे आदेशाच्या प्रक्रियेत मागील वर्षी म्हणजे सन २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व विहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या ८ तालुक्यांमधील १,४७२ प्रकरणांत सुनावणी होऊन प्रकरणे आदेशासाठी ठेवण्यात आली आहेत. उर्वरित १,२८७ प्रकरणे पंजीबद्ध करण्यात आली असून कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालायातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागाने सांगितले. असा आहे अधिनियम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक संपल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ (अ) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या राखीव प्रभागातील विजयी उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. १,०९९ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र अप्राप्त जिल्ह्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापूर्वी एप्रिल २०१५ मधील निवडणुकीतील विजयी उमेदवारांपैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या १०१९ उमेदवारांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासन कारवाई करीत आहे.