शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

३.७३ लाख हेक्टर बाधित, २५४ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:01 IST

यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना बीजे फुटली.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल : ३.७५ लाख शेतकऱ्यांना फटका, २.१२ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचे नुकसान

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने खरिपासोबतच ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा ३ लाख ७५ हजार ३९८ शेतकऱ्यांना फटका बसला. या आपत्तीसाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफची मदत मिळण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने २५४ कोटी ४० लाख ४३ हजार ४८४ रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे.यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना बीजे फुटली. दाण्यांवर बुरशी आल्याने प्रतवारी खराब झाली, कपाशीचे बोंडे दहा दिवसांच्या पावसामुळे सडली. कापूस ओला झाला. सरकीला बीजांकुर फुटले. ज्वारीची कणसे काळी पडली, कणसामधील दाण्यांना कोंब फुटले, या नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण व संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ आॅक्टोबर रोजी दिले. यासाठी ६ नोव्हेंबर डेडलाइन देण्यात आली. मात्र, नुकसानाची तीव्रता पाहता, पंचनाम्याला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. अखेर ११ नोव्हेंबरला संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली व याबाबतचा संयुक्त अहवाल सोमवारी रात्री उशिरा शासनाला पाठविण्यात आला. यामध्ये ९४ टक्के शेतकºयांच्या पिकांचे ७८ टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, खरिपाचे ३ लाख ७३ हजार १९ हेक्टर क्षेत्रात ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. हे नुकसान एनडीआरएफच्या निकषानुसार शासन मदतीस पात्र आहे. यासाठी दोन हेक्टर मर्यादेत ६८०० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे २५३ कोटी ६५ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा अपेक्षित निधी लागणार आहे. अवकाळी पावसामुळे २,१२,३२९.४४ हेक्टरवरील सोयाबीन, १,३५,४७२.७० हेक्टरवरील कपाशी, ११,०३६.९७ हेक्टरवरील ज्वारी, २,७०६.२३ हेक्टरवरील तूर, ५०६३ हेक्टरवरील मका, ५,५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद व ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.‘एनडीएरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टर क्षेत्रमर्यादेत जिरायती शेतीला ६८०० रुपये, बागायती पिकांना १३ हजार ५०० रुपये व बहुवार्र्षिक पिकांना १८००० रुपये प्रतिहेक्टर या प्रमाणात मदत मिळू शकते. यासाठी अपेक्षित निधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेला आहे.२,६५,०८३ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार फक्त दोन हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र राहणार आहे. त्यामुळे जिरायतीच्या एकूण बाधित क्षेत्राच्या २ लाख ६५ हजार ८३ हेक्टर क्षेत्राला ही मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त नुकसान झालेले १ लाख ७ हजार ९६६ हेक्टर क्षेत्र हे दोन हेक्टर मर्यादेहून जास्त असल्याने मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बागायती पिकांमध्ये दोन हेक्टरखालील ३८६ हेक्टर क्षेत्रासाठी मदत मिळू शकते. मात्र, ६५ हेक्टर क्षेत्राला शासन मिळणार नाही. बहुवार्षीक फळपिकांमध्ये ४५ हेक्टरसाठी शासन मदत मिळण्याची शक्यात आहे, तर ३३ हेक्टरमध्ये शासन मदत मिळणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती