शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

चिखलदऱ्यात लागलेल्या आगीत ३७ घरे बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:16 IST

सेमाडोह येथील मुलताई ढाण्यात सोमवारी सकाळी ९.३० वाजता अचानक आग लागल्याने सुमारे ३७ घरांची राखरांगोळी झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आदिवासी उघड्यावर आले आहेत.

ठळक मुद्देम्हैस ठारआदिवासी कुटुंबे उघड्यावरआयुष्याची पुंजी उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  सेमाडोह येथील मुलताई ढाण्यात सोमवारी सकाळी ९.३० वाजता अचानक आग लागल्याने सुमारे ३७ घरांची राखरांगोळी झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आदिवासी उघड्यावर आले आहेत. आग विझवण्यासाठी चिखलदरा व अचलपूर येथून अग्निशमन दल पाठविण्यात आले होते. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळाला भेट देऊन प्रशासनाला आगग्रस्तांना मदतीच्या सूचना दिल्या.येथील सोनुजी येवले यांच्या घराशेजारी असलेल्या उकिरड्यावर चुलीतील गरम राख फेकल्याने सर्वप्रथम कचऱ्याने पेट घेतला. तेथून एका रांगेत असलेल्या घरांनी एकापाठोपाठ पेट घेतला. त्यात जवळपास ३७ घरे पूर्णत: नष्ट झाली. त्यामुळे आदिवासी आणि गवळी बांधवांचा संसार उघड्यावर आला आहे. आगीत एक म्हैस ठार झाली. मुलताई ढाण्यातील आदिवासी दोन किलोमीटर अंतरावरील रोहयोच्या कामावर गेले होते. यामुळे घरांना आग लागली तेव्हा मोजकेच लोक ढाण्यात होते. घरात साठवून ठेवलेले पाणी नागरिकांनी आगीवर ओतले; मात्र हवेच्या वेगाने कुडा-मातीची घरे व गवती छपरामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.अचलपूर व चिखलदरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जाऊन आग आटोक्यात आणली. आगीची माहिती मिळताच आमदार प्रभुदास भिलावेकर, उपविभागीय अधिकारी विजय राठोड, चिखलदराचे तहसीलदार प्रदीप पवार, जि.प. सदस्य सुनंदा काकड, गाजू काकड, प्रदीप सेमलकर, शिवा काकड, राजा तनपुरे, रामदास बावसकर, लाला मावस्कर, भला मावस्कर, संदीप बारावेसह गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. आगग्रस्त कुटुंबांना प्रशासनाच्यावतीने तात्पुरती निवासाची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेतील दोन सभागृहांमध्ये करण्यात आली आहे. धान्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली. शासननियमानुसार मदत दिली जाणार असल्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले.

दोन चिमुकले बचावले, मातेचा आकांतया आगीत एका झोपडीमध्ये दोन चिमुकले झोपले होते. आग लागताच सर्वत्र एकच हल्लकल्लोळ माजला.एका घरात दोन चिमुकले झोपले होते. समयसूचकता दाखवित ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले. एक पाच वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याने तिच्या आईने रडून आकांत केला. ती जळाल्याची भीती व्यक्त होत असताना, आगीच्या भीतीने सेमाडोह गावात गेलेली ती बालिका परतली. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

सेमाडोह येथील आगग्रस्तांना शासनामार्फत तात्काळ सुविधा देण्यासोबत त्यांच्या निवासाची व धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत.प्रभुदास भिलावेकर, आमदार, मेळघाट

टॅग्स :fireआग