शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘एसबीएम’मधून विभागाला ३७ कोटींचा निधी, हगणदारीमुक्तीचा संकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:59 IST

अमरावती : केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (एसबीएम) अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांना एकूण २५१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

अमरावती : केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (एसबीएम) अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांना एकूण २५१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यात केंद्राचा २१९ कोटी, तर राज्याचा ३२ कोटी रुपयांचा हिस्सा आहे. ही रक्कम वितरित करण्यास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हिरवी झेंडी दिली. हा निधी जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्याचा शासनाने ३ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. अमरावती विभागाच्या वाट्याला ३७.६९ कोटींचा निधी आला आहे.देशातील शहरे स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी केंद्राने स्वच्छ भारत मिशन नागरी व ग्रामीण हाती घेतले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी केंद्राने २१९ कोटींचा दुसरा हिस्सा व राज्य सरकारने ३२ कोटींचा राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिली. या निधीतून वैयक्तिक शौचालयांसह सामुदायिक, सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधणीचाही या अभियानात समावेश आहे. राज्याचा ग्रामीण भाग हगणदारीमुक्त करण्यासाठी ‘एसबीएम’मधून निधी दिला जात असल्याने शहरांबरोबरच ग्रामीण भागाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी या निधीचा विनियोग करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, त्याचवेळी हा निधी जिल्हा परिषदांनी ३ डिसेंबरपर्यंत खर्च करावा, अन्यथा आपणास आवश्यकता नसल्याचे  समजून हा निधी इतर जिल्ह्यांमध्ये वळविण्यात येईल. सदर अनुदान सशर्त मंजूर करण्यात येत असल्याची अट पाणीपुरवठा विभागाने घालून दिली आहे. 

विभागातील जिल्हा परिषदांना मिळालेला निधी (लाखांत) अमरावती - ९५९.१९यवतमाळ - १३७१.००अकोला - ५७६.९०वाशिम - २८५.०४बुलडाणा - ५७७.२३

टॅग्स :Amravatiअमरावती