शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

३६ पाणवठे भागवितात वन्यप्राण्यांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:42 IST

यंदा चिरोडी, पोहरा, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, भातकुली या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम असे ३६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्याची छायाचित्रे कैद झाली.

ठळक मुद्देसात सर्कलचा समावेश : वनविभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : यंदा चिरोडी, पोहरा, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, भातकुली या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम असे ३६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्याची छायाचित्रे कैद झाली.चिरोडी वर्तुळात नैसर्गिक व कृत्रिम सात, पोहरा वर्तुळात सहा, वडाळी वर्तुळात सात, मालेगाव वर्तुळात नैसर्गिक सहा पाणवठे, बडनेरा वर्तुळात नैसर्गिक तीन पाणवठे, भातकुली वर्तुळात नैसर्गिक तीन पाणवठे, चांदूर रेल्वे वर्तुळात नैसर्गिक चार असे मिळून दोन्ही वनपरिक्षेत्राच्या वर्तुळात एकूण ३६ पाणवठे आहेत. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात दोन्ही वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यांची देखरेख व स्वच्छता होत आहे. वन कर्मचाऱ्यांची नियमित गस्त असल्याने जंगलात शिरण्याचे कुणीही धाडस करीत नाहीत. त्यामुळे वडाळी आणि चांदूर रेल्वे जंगलातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत असल्याचे दिसून आले.दोन्ही वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांचे वास्तव्यबिबट, हरिण, रोही, चिकारा, भेडकी, चितळ, काळवीट, देवगाई, रानडुक्कर, लांडोर, ससे, मोर, सायल व इतर पशूपक्ष्यांचे वास्तव्य आढळून आले आहेत. या वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये, याकरिता दोन्ही वनपरिक्षेत्राच्या जंगलात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

टॅग्स :Waterपाणीforestजंगल