शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील ३५ हजार शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:43 IST

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना शेतकऱ्यांना त्यांच्या तूर व चणा खरेदीची आस लागली आहे. तूर व चण्याचे माप व खरेदी रखडल्याने तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.

ठळक मुद्देखरेदी रखडली बारदाण्याअभावी मोजमाप होईना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना शेतकऱ्यांना त्यांच्या तूर व चणा खरेदीची आस लागली आहे. तूर व चण्याचे माप व खरेदी रखडल्याने तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. खरीपपूर्व मशागत आणि मुलामुलींचे लग्न व अन्य आर्थिक व्यवहार कसा करायचा, अशी विवंचना त्यांच्यासमोर आहे. २४ हजार तूर उत्पादक व ११ हजार चणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी रखडली आहे.खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये, या उदात्त हेतूने शासानाने नाफेडकरवी तूर व चणा खरेदी केंद्र उशिरा का होईना, सुरू केले. तालुकास्तरावर १२ केंद्रांच्या माध्यमातून तूर-चण्याची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यासाठी आॅनलाइन सातबारा, आधारकार्ड, पीकपेऱ्यांची नोंद अशा बाबी अनिवार्य करण्यात आल्या. तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतकऱ्यांनी आॅनलाइन सातबारा मिळवित व प्रसंगी हस्तलिखित सातबारा देत आॅनलाइन नोंदणी केली. मात्र, पुरेशा बारदान्याअभावी ३५ हजार शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप व पर्यायाने खरेदी रखडली आहे. दोन ते तीन महिन्यानंतरही खरेदी व तूर, चण्याची किंमत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांवर उसनवारी व प्रसंगी सावकारी कर्ज घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.९०२२ शेतकऱ्यांचीच तूर खरेदीजिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूररेल्वे, नांदगावर खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड, अमरावती व चांदूरबाजार या १२ ठिकाणी एकूण ३३ हजार २ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. पैकी १३ एप्रिलपर्यंत ९०२२ शेतकऱ्यांची १ लाख २२ हजार ६२७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.चण्याचीही तीच स्थितीनाफेडद्वारे शासकीय हमीभावात चणा खरेदी करण्यासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १२ के ंद्र सुरु करण्यात आली. या केंद्रांवर १२ हजार ३२६ शेतकऱ्यांनी त्यांच्या चनाची आॅनलाईन नोंदणी केली. पैकी केवळ ३९६ शेतकऱ्यांची ६२०० क्विंटल चण्याची खरेदी करण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी