दोन गंभीर : ‘आरडीआयके’, कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेशबडनेरा : ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे एसटी झाडावर आदळून दोन विद्यार्थींनी गंभीर तर ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना अंजनगावबारी मार्गावरच्या मध्यवर्ती नाक्याजवळील वळणावर शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अन्य प्रवासीही जखमी झाले आहेत. या अपघातात दीक्षा सवई व प्रतीक्षा गुलालकरी या दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून राणी अंबाडकर, किरण तलमले, मीना सोनवणे, तेजस्विनी मोहोड, जयश्री काळे, सुषमा झिंगने, कपिल तरासे, समीक्षा तायवाडे, स्नेहा जयस्वाल, सागर कारकून, चैताली सुने, प्रियंका रोडे, अर्चना गवई, चंचल खोब्रागडे, वासूदेव मुंडले, रुपेश परिमल, सुशील गोमासे, मोहिनी काकडे, कमल खडसे यांच्यासह एकूण ३५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.चालक खात होता खर्रा बसचालक एसटी चालवीत असताना वळण मार्गावर हात सोडून खर्रा खात असल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी केला आहे. एसटीच्या प्रवेशद्वाराजवळ काही प्रवासी उभे होते. त्यांचे लक्ष एसटीचालकाकडेच होते.शिवसेनेची माणुसकीशिवसेनेचे संजय बंड, अमोल निस्ताने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थावाईकपणे चौकशी केली. जखमी विद्यार्थी सकाळपासून सकाळपासून उपाशी होते. या मंडळींनी त्यांच्यासाठी खाद्यान्नाची व्यवस्था केली.पालकमंत्र्यांनी दिली भेटया भीषण अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. जखमींच्या उपचाराकरिता वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असेल तर खासगी रुग्णालयातील डॉक्टर बोलवून जखमीवर तत्काळ उपचार करण्याचे निर्देश पोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांना दिले. आ.रवी राणा, नितीन धांडे, नगरसेविका जयश्री मोरे, आरडीआयकेचे प्राचार्य राजेश देशमुख यांनी रुग्णालयात भेट दिली.
३५ विद्यार्थी जखमी
By admin | Updated: October 18, 2015 00:29 IST