शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३५ उमेदवार, ६९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:21 IST

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.

ठळक मुद्देदाखल निरंक : राजकीय पक्षांच्या नावे १४ तर २१ अपक्ष इच्छुक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ पासून उमेदवारी अर्ज घेण्यास उमेदवारांकडून सुरुवात झाली. सर्वप्रथम अधिवक्ता चंद्रशेखर डोरले यांनी भाजप-शिवसेना युतीच्या नावे आनंदराव अडसूळ यांच्याकरिता चार अर्ज, तर युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांच्याकरिता कमलताई गवई यांनी चार अर्जाची उचल केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नावे राजू कोंडे व पंकज मेश्राम यांनी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नावे आनंद धवने व राहुल मोहोड, रिपब्लिकन सोशल मुव्हमेंटच्या नावे महेश तायडे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या नावे प्रमोद खडसे, बहुजन समाज पार्टीच्या नावे बापू बोते, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया डेमोकॅ्रटिकच्या नावे राहुल देशमुख, भारिप-बहुजन महासंघच्या नावे दिलीप वासनिक यांनी गुणवंत देवपारे यांच्याकरिता अर्जाची उचल केली. भारतीय दलित आदिवासी पँथर सेनेच्या नावे जगदीश इंगळे व मानवी हक्क सुरक्षा दलाच्या नावे डॉ. रेखा रणबावणे व शीला मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज घेतले. २१ अपक्ष उमेदवारांनीदेखील पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जाची उचल केलेली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर अंतरात उमेदवारासह पाच व्यक्तींनाच प्रवेश तसेच तीन वाहनांना परवानगी, अर्ज उचल व दाखल प्रक्रिया ‘इनकॅमेरा’ असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांना शक्तिप्रदर्शनाचा मोह टाळावा लागणार आहे.अपक्षाला हवेत १० सूचकउमेदवारी अर्ज २६ मार्चपर्यंत दाखल करता येणार आहेत. यामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक (प्रस्तावक), तर अन्य राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना १० सूचक लागणार आहे. अर्जाची छाननी २७ मार्च, माघार २९ मार्च, तर १८ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.