शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, प्रेमाला वयाचे बंधन नाही; ५४ वर्षीय शिक्षिकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 10:47 IST

एका ५४ वर्षीय विवाहित महिला शिक्षिकेचे ३४ वर्षीय युवकासोबत एक वर्षापूर्वी मैत्री झाली, पुढे प्रेमात रुपांतर झाले. याचा फायदा घेत युवकाने महिलेला पैशांसाठी ब्लॅकमेल करण सुरू केले.

ठळक मुद्देआधी मैत्री, मग प्रेम, प्रेमात खंडणी, शिवीगाळ अन् धमकीही३४ वर्षीय युवकाविरुद्ध पोलिसात तक्रार

अमरावती : प्रेमाला वयाची बंधने नसतात, असे म्हणतात. अशातच एका ५४ वर्षीय विवाहित महिला शिक्षिकेचे ३४ वर्षीय युवकासोबत एक वर्षापूर्वी मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर लागलीच प्रेमात झाले. फेसबुक आणि व्हाॅट्सअपवर बोलणे चालू झाले. तेव्हापासून प्रेमप्रकरण बहरत राहिले.

दरम्यान, व्यवसाय सुरू करण्याकरिता त्या प्रियकर युवकाने आपल्या या प्रेयसीला पैसे मागितले. तेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला. यावर तिला त्याने धमकावले. पैसे दे नाही, तर व्हाॅट्सॲपवरील मेसेज आणि तुझे सर्व फोटो व्हाट्सअपवर जाहीर करेल. तू जर पैसे दिले नाही, तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली. यादरम्यान त्याने शिवीगाळही केली.

तिचा पाठलाग करून तिला त्रास देत जवळीक साधण्याचा त्याने प्रयत्नही केला. यात त्या महिला शिक्षिकेने त्यास समजाविण्याचा प्रयत्नही केला. परतवाड्यापासून जवळच असलेल्या एका खेड्यातील या प्रियकराचा त्रास अधिकच वाढल्यामुळे अखेर त्या महिला शिक्षिकेने परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने परतवाडा पोलिसांनी त्या ३४ वर्षीय युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

दुसऱ्या एका प्रकरणात महिला कर्मचाऱ्याची १५ लाखांनी फसवणूक

वयाचे बंधन झुगारणाऱ्या अशाच एका प्रकरणात ३६ वर्षीय महिला कर्मचाऱ्याची १५ लाखांनी फसगत झाली होती. तिचे परतवाड्यातील २९ वर्षीय युवकासोबत प्रेम जुळले. तब्बल तीन वर्षे हे प्रेम चांगलेच बहरले. यातही आधी ओळख, मग प्रेम, प्रेमात लग्नाचे आमिष आणि फसगत व शारीरिक शोषण असाच घटनाक्रम पुढे आला. ही घटना २२ नोव्हेंबरला उजेडात आली. यात महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. राऊत याही प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची घटना उजेडात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी