शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

३४ सरपंचांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:16 IST

केंद्र, राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबात शौचालय असणे बंधनकारक केले असताना गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांनी शौचालय बांधकामाकरिता सहकार्य न केल्याने ....

विभागीय आयुक्तांचे आदेश : शौचालय बांधकामात सहकार्य नाहीलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : केंद्र, राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबात शौचालय असणे बंधनकारक केले असताना गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांनी शौचालय बांधकामाकरिता सहकार्य न केल्याने तालुक्यातील ३४ सरपंचांवर जि.प. अधिनियम अंतर्गत कारवाई व ग्रामसेवकाचे थेट निलंबन करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिले आहे़ग्रामस्वच्छता अभियानात घर तिथे शौचालयाला अधिक महत्त्व आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्तांनी शौचालयासंदर्भात कडक भूमिका घेतली आहे़ गत आठवड्यात विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तालुक्याचा लेखाजोखा घेतला असता केवळ २८ ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के शौचालय पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आले. यंदा दिलेल्या उदिष्टांपैकी आजपर्यंत ५ हजार ८२१ कुटुंबांकडे शौचालये नाहीत, याविषयी पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाने संबंधित ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना व सचिवांना वारंवार पत्र देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र सहकार्य करण्याऐवजी उडवाउडवीचे उत्तर स्थानिक लोकप्रतिनिधीने दिल्यामुळे विभागीय आयुक्ताने एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी १ आॅगस्टपर्यंत ज्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रापसदस्य गावात शौचालय बांधण्याकरिता सहकार्य करीत नसेल अशा लोकप्रतिनिधींवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांना पाठविण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहे़ दरम्यान सोबत ग्रामसेवकांच्या कामाचा आढावा पाठवून त्यांच्यावर शौचालय उभारणी बाबत काय कारवाई केली याविषयी लेखी अहवाल पाठविण्याचे आदेश बैठकीत दिले आहे़तालुक्यातील ६ हजार कुटुंबांकडे शौचालय नसून या गावातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य गरजेचे आहे़ मात्र कोणतीही मदत ग्रामसेवकांना मिळत नसल्याने १ आॅगस्टनंतर विभागीय आयुक्तांना या गावाचा ग्रामपंचायत अधिनियम ३९ एक याप्रमाणे कारवाईचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे़- पंकज भोयर, गटविकास अधिकारी, धामणगाव रेल्वे