शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत धावल्या ३४ बसेस, अन उत्पन्न मिळाले ३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

कोरोना वीकेंड लॉकडाऊन; एसटी महामंडळावर आर्थिक संकट अमरावती : कोरोना वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांच्या बंदमुळे एसटी महामंडळाला ...

कोरोना वीकेंड लॉकडाऊन; एसटी महामंडळावर आर्थिक संकट

अमरावती : कोरोना वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांच्या बंदमुळे एसटी महामंडळाला केवळ ३ लाख ३७ हजार रुपयांचेच उत्पन्न मिळाले असून, ७ लाख २४ हजार ९२० रुपयांचा आर्थिक फटका अमरावती मध्यवर्ती आगाराला बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संपूर्ण बंद पुकारला जात असल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या बसेसवर होत आहे. जिल्ह्यात महामंडळाचे आठ आगार आहेत. त्यातून शेकडो बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून जिल्ह्यांतर्गत तसेच लांबपल्ल्याच्या बसेस सोडल्या जातात. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शासनाने निर्बंध लावले आहेत. त्यानुसार शनिवार आणि रविवारी शासनाने वीकेंड लॉकडाऊन घोषित केल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. शिवाय नागरिक घराबाहेर पडत नसल्याने रस्ते ओस पडली आहेत. आठवडी बाजार केव्हाच बंद करण्यात आले. त्यामुळे साहजीकच संपूर्ण बाजारपेठेवर परिणाम झाला असून महामंडळात देखील प्रवासीसंख्येचा परिणाम जाणवत आहे.

बॉक्स

मध्यवर्ती आगारातील एकूण बसेसची संख्या -५८

दोन दिवसांत धावलेल्या बसेस -३४

फेऱ्या झाल्या आगारात-१३८

३ लाख ३७ हजार रुपये मिळाले दोन दिवसात

बॉस

दोन दिवसात लाखोचे नुकसान

अमरावती मध्यवर्ती आगारातून पुणे, औरंगाबाद, परभणी, जळगाव, मांडवी, हिंगोली यासारख्या मोठ्या शहरांत बसेस धावतात. गत जानेवारीपासून महामंडळाच्या बसेस रुळावर येत असतानाच जानेवारीपासून पुन्हा कोरोनाची संख्या वाढल्याने अमरावती आगारातून धावणाऱ्या बसेसची संख्या बरीच कमी झाली आहे. दररोज ५० ते ५५ हजार किलोमीटर जाणाऱ्या बसचे अवघ्या ८,७०० किलोमीटरपर्यंत येऊन थांबल्या आहेत.

शनिवारपेक्षाही रविवारी सर्वाधिक परिणाम झाल्याचे जाणवले. रविवारी केवळ ७ ते ८ हजार किलोमीटरचा बसेस धावल्या प्रवासी नसल्यामुळे झालेला परिणाम लॉकडाऊनच्या शक्यतेने अजूनही कमी झालेला आहे.

बॉक्स

अवघ्या ३० ते ३५ गाड्या

मागील वर्षीच्या परिस्थितीतून सावरत अमरावती आगारातून किमान २०० हून अधिक बसफेऱ्या सुरू होत्या. जानेवारी चांगले उत्पन्न मिळत असताना पुन्हा कोरोनाचा फटका बसला. इतर वेळी ४० ते ४५ बसेस धावत आहेत. शनिवार-रविवारी ही संख्या ३० ते ३४ गाड्यांवरच आल्याने उत्पन्नात घट होत आहे.

बॉक्स

सर्वच आगारांना वीकेंडचा फटका

अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, चांदुर रेल्वे, मोर्शी, वरूड, परतवाडा, दर्यापूर, चांदूर बाजार या एसटी आगाराच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी घट झाली आहे. कोरोनामुळे नियमित गाड्या बंद करण्याची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांना देखील काम नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकांपैकीच एक आहे. यावरून जिल्ह्यातील आगाराची परिस्थिती समोर येते.

कोट

विभागात महामंडळाला दोन दिवसांत मोठे नुकसान सहन करावे लागले. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या सोडण्यात आल्या. सोमवारपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यास शासनाच्या निर्देशानुसार निर्णय घेतला जाईल.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक