शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमधील ३३ टक्के पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 20:28 IST

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अमरावती महापालिकेला पत्र दिले होते.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यातउपाययोजनेसाठी राज्य शासनाचे महापालिकेला पत्र

वैभव बाबरेकरअमरावती : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. मे महिन्यात ३३ टक्के दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यावर उपाययोजनासंदर्भात अमरावती महापालिकेला पत्र दिले होते. दूषित पाण्याची वाढती टक्केवारी ८ लाख अमरावतीकरांसाठी धोक्याचीच घंटा मानली आहे.पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असून रोगराई पसरण्याची शक्यताही वाढते. शहरात सध्या या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगीमध्ये आबालवृद्धांचा ओघ वाढत आहे. याला दूषित पाणीच कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. अमरावती महापालिकेकडून शहरातील उपहार गृह, विहिरी, शाळा-महाविद्यालये, मंगल कार्यालये, कॅन, शीतपेयगृहे, कुपनलिका-बोअरवेलसह अन्य पाणी स्त्रोतांचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जातात. त्यात दर महिन्याला पाणी नमुने दूषित आढळून येत आहे. जुलै महिन्यात आरोग्य प्रयोगशाळेकडून महापालिका हद्दीतील दवाखान्यांचे २०८ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी २६ नमुने दूषित आहेत. या अनुषंगाने पुणे येथील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे तत्कालीन उपसंचालक (आरोग्य सेवा) सुहास बाकरे यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यात महापालिका क्षेत्रात ३३ टक्के पाणी दूषित आढळल्याने जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवून उपायायोजना करण्याचे निर्देश दिले आहे.एप्रिल ते जुलैपर्यंतची दूषित पाण्याची आकडेवारी- सार्वजनिक नळ १९७ पैकी २३ दूषित- खासगी नळ १३ पैकी ५ दूषित- सार्वजनिक विहिरी ८१ पैकी ३१ दूषित- हॉटेल ११३ पैकी २९ दूषित- शाळा-महाविद्यालये ३८ पैकी २२ दूषित- शीतपेयगृह १६ पैकी २ दूषित- मंगल कार्यालये १६ पैकी ४ दूषित-चाट भंडार ९ पैकी ३ दूषित-कॅनच्या २६ पैकी ८ दूषित-हातपंप व बोअर ३९ पैकी १८ दुषित-इतर ७१ पैकी ९ दुषित१५२ जणांना नोटीस, १६ जणांकडून दंड वसुलीदूषित पाणी आढळलेल्या १५२ जणांना महापालिकेकडून नोटीस बजावली असून, १६ जणांकडून दंड वसुलण्यात आला आहे. दूषित नमुने आढळलेली उपाहारगृहे, प्रतिष्ठान, संस्थांना महापालिका नोटीस बजावते, त्यानंतरही पाणी दूषित आल्यास दंड ठोठावते.दूषित पाणी आढळल्यास नोटीस व दंडदूषित पाणी आढळलेल्या आस्थापनाला महापालिकेकडून नोटीस व दंड ठोठावण्यात येते. मात्र, नोटीस व दंड दिला जात असतानाही दूषित पाणी आढळूनच येत नाही. त्यामुळे पाणी शुद्धतेबाबत महापालिका अमरावतीकरांना केव्हा हमी देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पाणी नमुने दूषित आढळल्यास संबंधित आस्थापनाला नोटीस बजावण्यात येते. पुन्हा पाणी दूषित आढळल्यास दंड दिला जातो. पाण्याची शुद्धता ठेवण्यासाठी सक्त ताकिद दिली जाते.- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिकादूषित पाणी आढळल्यास आमच्याकडून संबंधित महापालिकेला उपाययोजनांसाठी पत्र दिले जाते. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनीही कळविण्यात येते.- तानाजी माने,उपसंचालक, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण