शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात आरटीओचा ३२३ कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 19:38 IST

परिवहन विभागाने आरटीओला अमरावती विभागासाठी २७९ कोटी ६८ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी ७० लक्ष ९८ हजारांचा महसूल गोळा करून ११५ टक्के वसुली केली.

 - संदीप मानकर 

अमरावती - परिवहन विभागाने आरटीओला अमरावती विभागासाठी २७९ कोटी ६८ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी ७० लक्ष ९८ हजारांचा महसूल गोळा करून ११५ टक्के वसुली केली. ८३ कोटी ३ लाख २८ हजारांची सर्वाधिक वसुली यवतमाळ जिल्ह्याने केली आहे. ही टक्केवारी १२५ टक्के आहे.   आरटीओ विभाग विविध वाहनांवरील कारवाया, दंडात्मक रक्कम, तडजोड शुल्क, विविध वाहनांच्या नोंदण्या तसेच इतर अनेक प्रकारचे कर आकारत महसूल गोळा करतो. यामध्ये अमरावती विभागात वर्षभरात ५६ हजार २५२  वाहनांची तपासणी करण्यात आली होती. तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या वाहनांची संख्या ही १८ हजार ८४ आहे. त्यामध्ये तडजोड शुल्कांची उद्दिष्टे हे ८५२.०० लक्ष होते. तर तडजोड शुल्कपोटी ७६०.९२ लक्ष पाचही जिल्ह्यांमध्ये आकारण्यात आले. विविध प्रकारच्या थकीत करांची रक्कम ही १६५.८४ लक्ष होती. त्यापैकी १३७.१७ लक्ष वसूल करण्यात आली. यासाठी आरटीओने विविध पथक स्थापन करून कारवायांचा सपाटा लावला होता. त्यामुळे मागील वर्षीच उद्दिष्ट प्राप्त होऊ शकली, हे विशेष!

सर्व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी चांगली कामगिरी करून उद्दिष्ट तर पूर्ण केले; त्यापेक्षाही ११५ टक्के महसूल  मिळविण्यात यश आले आहे. यासाठी पथकही तयार केले होते. - रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावती