शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

३८४ गावांमध्ये ३१ हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:40 IST

जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळासह अवकाळी पाऊस, गारपीटमुळे ८ तालुक्यांत ३५ महसूल मंडळांतील ३८४ गावांमध्ये ३० हजार ७२७ हेक्टरमधील रबी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देगारपीट : चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक नुकसान

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळासह अवकाळी पाऊस, गारपीटमुळे ८ तालुक्यांत ३५ महसूल मंडळांतील ३८४ गावांमध्ये ३० हजार ७२७ हेक्टरमधील रबी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.रविवारी सकाळी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात अवकाळी पाऊस पडला. वादळासह वीज व गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये रबी हंगामाचा गहू जमिनीवर पडला, तर गाठ्यावर आलेल्या हरभऱ्याला गारपीटचा मार बसला. कांदा व भाजीपाला पिकांचे गारपीटने मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या मृग बहराची फळगळ झाली, तर आंबिया बहरदेखील गळाला. यंदा प्रथमच आंबा मोठ्या प्रमाणात मोहोरला होता. या मोहोराचेदेखील गारपीटने नुकसान झाले. पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांनी रविवारी या आपत्तीचा आढावा घेऊन तत्काळ पाहणी करण्याच्या सूचना क्षेत्रिय यंत्रणेला दिल्यात. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल सोमवारी सर्व तहसीलदारांनी पाठविला. यामध्ये पाऊस जरी सर्व तालुक्यात झाला असला तरी गारपीट मात्र आठ तालुक्यांत झाल्याने या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. रविवारी सर्वाधिक २५.५ मिमी पाऊस अचलपूर तालुक्यात २५ मिमी वरूड १४.८ अंजनगाव सुर्जी, १७ मिमी मोर्शी, १०.४ मिमी भातकुली, १० मिमी पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात पडल्याची नोंद आहे.वरुड-मोर्शी संत्रा,गव्हाचे नुकसानवरुड/मोर्शी : तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले असून सोमवारी गावसर्वेक्षणाचे रिपोर्ट महसूल विभागाला मिळाले आहे. यामध्ये ८५ हेक्टर शेतजमीनीवरील पिकांचे नुकसान झाले, तर वावरुळी परिसरात संत्रा गळाले. मोर्शी तालुक्यातही संत्रा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यास सुरूवात झाली आहे. पाळा शिवारासह तालुक्यातील संत्रा उत्पादकांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.असे आहे तालुकानिहाय नुकसानमोर्शी तालुक्यात तीन महसूल मंडळांतील ४० गावांमध्ये २,५०४ हेक्टर, वरूड तालुक्यातील सहा महसूल मंडळांतील ६ गावांमध्ये ५० हेक्टर, चांदूर बाजार तालुक्यातील सात महसूल मंडळांतील १५४ गावांमध्ये १७,१०३ हेक्टर, अचलपूर तालुक्यात पाच महसूल मंडळातील ५७ गावांमध्ये ६,३७५ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात दोन महसूल मंडळात १७ गावांतील ४३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाच महसूल मंडळांमध्ये ४,५२५ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात चार महसूल मंडळांतील ६ गावांमध्ये १६ हेक्टर, तर धारणी तालुक्यात चार महसूल मंडळातील २० गावांमधील ११० हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे.घुईखेड परिसरात दीडशे हेक्टर गव्हाचे नुकसानरविवारच्या वादळी पावसाचा घुईखेड भागातील २२ गावांना फटका बसला. परिसरातील गहूू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. जि.प सदस्या राधिका घुईखेडकर यांनी परिसराचा दौरा करून शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील घुईखेड भागात रविवारी मध्यरात्री वादळी पावसाने कहर केला. या भागातील निंभा, दानापूर, धोत्रा, मोगरा, टीटवा, बग्गी, जावरा, टोंगलाबाद, किरजवळा येथील गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वादळी पावसाने आमच्या तोेंडचा घास हिसकविल्याच्या व्यथा शेतकºयांनी डोळ्यात पाणी आणत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर व जि.प सदस्य राधिका घुईखेडकर यांच्याजवळ मांडल्या.दर्यापुरात अवकाळीने मोठे नुकसानदर्यापूर : तालुक्यात अवकाळी पावसाची वक्रदृष्टी कायम असून रविवारनंतर सोमवारीदेखील तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने जगावे कसे, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित झाला आहे. खरिपाचे पीक हातचे गेल्यानंतर सारी मदार रबी पिकावर होती. गंजीतला हरभरा पाण्यात ओला झाल्याने काळा पडण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. तालुक्यातील दारापूर, वडनेर गंगाई या जि.प. सर्कलमध्ये अधिक प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.