शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

डिजिटलायजेशनसाठी ३१ डिसेंबरच 'डेडलाईन'

By admin | Updated: December 22, 2015 00:19 IST

अ‍ॅनालॉग फेजवरून डिजिटलवर येण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची मुदत असून याला मुदतवाढ दिली जाणार नाही,

जिल्हाधिकारी : करमणूक करात होणार वाढअमरावती : अ‍ॅनालॉग फेजवरून डिजिटलवर येण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची मुदत असून याला मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे येत्या ९ दिवसांत ४० हजार ग्राहकांपर्यंत सेट टॉप बॉक्स पोहोचविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. आयोजित पत्रपरिषदेत अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी उपस्थित होते. जिल्ह्यात ५७ हजार घरांमध्ये केबल जोडणी असून आतापर्यंत केवळ १७ हजार ६४२ सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख, ६ लाख कुटूंब असताना केवळ ५७ हजार केबल जोडणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर झाकलेले ५० टक्के केबल टीव्ही कनेक्शन बाहेर येतील व महसुलामध्ये वाढ होईल, असा दावा त्यांनी केला. केबल कनेक्शनमधून जिल्ह्याला आतापर्यंत ४.२५ कोटी रूपये करमणूक कर मिळत होता आता १० कोटी रूपये वसूल करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाकडून देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५२४ शहरांमध्ये ३५ लाख २ हजार ४५३ टीव्ही संचांना सेट टॉप बॉक्स बसविण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. डिजिटल सेट टॉप बॉक्स संदर्भात ग्राहकाला कुठलीही तक्रार असेल तर त्याबाबत तहसीलदारांकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)१२०० रूपयांत बेसिक सेट टॉप बॉक्सबाजारात विविध प्रकारचे सेटटॉप बॉक्स उपलब्ध असले तरी सध्या सेटटॉप बॉक्सची किंमत १२०० रूपये आहे. हा सेटटॉप बॉक्स स्टँडर्ड डेफिनेशनमध्ये मोडणारा आहे तर हाय डेफिनेशनचे सेटटॉप बॉक्स १७०० ते २२०० पर्यंत उपलब्ध आहेत. ग्राहकांनी त्या सेटटॉप बॉक्सचे वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावरच रक्कम द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स उपलब्ध करून न दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी एमएसओ (बहुविध यंत्रणा परिचालक) वर टाकली आहे. १०० ते १५० रूपये इन्स्टॉलेशन चार्ज१२०० रुपयांपासून पुढे २२०० रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या सेटटॉप बॉक्स लावून घेण्यासाठी संबंधित केबल आॅपरेटर वा अन्य कुणीही अधिकाधिक १०० ते १५० रूपये ‘इंस्टालेशन चार्ज’ घ्यावा, यापेक्षा अधिक रक्कम आकारू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते व अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी केले. नव्या वर्षात डिजिटल सेटटॉप बॉक्स विना ट्रान्समिशन बंद होणार असले तरी ग्राहकांकडे डिशटिव्ही हा पर्याय असेल. पुरवठ्यात तफावतगेल्या चार वर्षांपासून डिजिटल सेटटॉप बॉक्स लावून घेण्यासंदर्भात जनजागृती सुरू आहे. मात्र आता टीव्हीच दिसणार नाही, या भीतीने सेट टॉप बॉक्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने पिळवणुकीच्या तक्रारीत भर पडल्याची कबुली जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. संबंधित केबल आॅपरेटरकडून सेटटॉप बॉक्स घेणे बंधनकारक नाही. ग्राहक बाजारातूनही हा बॉक्स घेऊ शकतो.