शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

कपाशीच्या विम्यात ३१ मंडळांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:32 IST

बाधित कपाशीला हेक्टरी आठ हजारांची विमाभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी २२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात केली. शासनघोषणेनुसार जिल्ह्यात १८.८८ कोटींची भरपाई मिळायला पाहिजे; मात्र या आठवड्याअखेर फक्त ९.११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे.

ठळक मुद्देशासन घोषणेचे तीनतेरा : १८ ऐवजी नऊ कोटींची भरपाई, कंपन्या जुमानेना

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाधित कपाशीला हेक्टरी आठ हजारांची विमाभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी २२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनात केली. शासनघोषणेनुसार जिल्ह्यात १८.८८ कोटींची भरपाई मिळायला पाहिजे; मात्र या आठवड्याअखेर फक्त ९.११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. यामध्ये ३१ महसूल मंडळांना वगळण्यात आल्याने विमा कंपन्या शासनाला जुमानत नाहीत अन् शासन केवळ वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याचे वास्तव आहे.गतवर्षीच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे १,९१,१७२ हेक्टरमधील जिरायती व बागायती कपाशीचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाले. जिल्ह्यात कपाशीच्या एकूण २,०७,४५७ हेक्टर पेरणीक्षेत्रापैकी १८ हजार ८४० शेतकºयांनी २३,६०१ हेक्टरचा विमा काढला. यासाठी ४.७२ कोटींचा विमा भरणा करण्यात आला. सद्यस्थितीत यापैकी १०,९९४ शेतकऱ्यांना ९,११,४९,८३५ रुपये भरपाई कंपनीद्वारा परपरस्परच बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये ४७ मंडळांत भरपाई मिळाली, तर ३१ महसूल मंडळ सद्यस्थितीत वगळण्यात आल्याचे स्पष्ट आहे.अचलपूर तालुक्यातील सहा मंडळांमध्ये १,४९९ शेतकºयांना १,६२,३८,९५३ रुपये, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पाच मंडळात १,५६० शेतकºयांना १,७३,३७,७६७, चांदूर बाजार तालुक्यातील पाच मंडळात १,७२१ शेतकºयांना ५८,९८,६९७, चिखलदरा तालुक्यात तीन मंडळात ५५ शेतकºयांना २,७७,७८६, दर्यापूर तालुक्यात एका मंडळात ५०८ शेतकºयांना २०,६१,५९९, धामणगाव रेल्वे तालुक्यात सहा मंडळात १,२०६ शेतकºयांना ८०,९६,६५४, मोर्शी तालुक्यात सात मंडळात १,५५५ शेतकºयांना १,६७,६५,१५२, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९७९ शेतकºयांना १,०८,९४,८५१, तिवसा तालुक्यातील पाच मंडळांत १,२७,३१,३२६ व वरूड तालुक्यातील दोन महसूल मंडळांत ३५७ शेतकºयांना ८,४७,०५१ रूपयांचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. विमा भरपाई न मिळालेल्या शासन मदत केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.या महसूल मंडळात विमाभरपाई निरंकमागच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कपाशीसाठी विमाभरपाई जमा करण्यात आली. सध्या ७९ पैकी ४८ मंडळात भरपाई देण्यात आली. उर्वरित ३१ मध्ये अमरावती व भातकुली तालुक्यात निरंक आहे. याशिवाय अंजनगाव तालुक्यात भंडारज, चांदूर बाजार तालुक्यात करजगाव, शिरजगाव कसबा, चिखलदरा तालुक्यात चुरर्णी, सेमाडोह, दर्यापूर तालुक्यात दर्यापूर, रामतीर्थ, सामदा, थिलोरी, वडनेरगंगाई व येवदा, धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर व वरूड तालुक्यात पुसला, राजुराबाजार, शेंदूरजना घाट, वरूड व वाठोडा महसूल मंडळात वाटप निरंक आहे.अशी मिळाली पीकनिहाय भरपाईजिल्ह्यात सद्यस्थितीत ४२,९०४ शेतकऱ्यांना ६० कोटी ८७ लाखांची भरपाई देण्यात आली. उडिदासाठी ४,०६५ शेतकºयांना ४.५८ कोटी, मुगासाठी ६,६८१ शेतकºयांना ७.५७ कोटी व सोयाबीनसाठी २१,१६४ शेतकºयांना ३९.५९ कोटींची भरपाई बँक खात्यात १७ एप्रिलअखेर जमा करण्यात आली असल्याची माहिती आहे.