शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मध्य रेल्वे मुंबई विभागात तिकीट तपासणीतून ३०३ कोटींचा महसूल मिळाला

By गणेश वासनिक | Updated: July 10, 2023 19:34 IST

मध्य रेल्वे मुंबई विभागात तिकीट तपासणीतून ३०३ कोटींचा महसूल मिळाला आहे.

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागात तिकीट तपासणीतून ३०३ कोटींचा महसूल मिळाला आहे. सन २०२२-२०२३ आर्थिक वर्षात ४६ लाख ८६ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून पहिल्यांदाच जूनपर्यंत ४१.५० टक्के महसूल उत्पन्नात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

तिकीट तपासणी महसुलात मध्य रेल्वेने उद्दिष्ट २३५ कोटी ५० लाख एवढे आहे. मात्र, ३०३ कोटी ही लक्षणीय वाढ ठरली असून, कोणत्याही विभागीय रेल्वेने हा टप्पा गाठण्याची पहिलीच वेळ आहे. चालू आर्थिक वर्षात जून २०२३ पर्यंत मध्य रेल्वेने १३,३३९.५५ हजार प्रकरणे नोंदविली आहेत आणि १०७६.२५ हजार प्रकरणांच्या उद्दिष्टाविरुद्ध ९४.०४ कोटी कमावले आहेत. अनुक्रमे ६६४९.२५ कोटी अशा प्रकारे प्रकरणांमध्ये २५.५१ टक्के आणि महसुलात ४१.४२ टक्क्याने उद्दिष्ट पार केले.रेल्वे दंडाधिकाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भुसावळ, मनमाड, खंडवा, नागपूर, दौंड आणि पुणे या विविध रेल्वेस्थानकांवर रेल्वे दंडाधिकारी नियुक्त केले जातात. दंडाधिकारी पथक म्हणून संलग्न तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचारी हे रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या सोबत कर्तव्य बजावतात. धावत्या गाड्यांमध्ये आणि रेल्वेस्थानकांवर तपासणी करून फुकट्या प्रवाशांकडून दंडात्मक शुल्क आकारून ते महसूल म्हणून गोळा करतात, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.