शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील ३०० महिला चालविणार गुलाबी ई-रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:55 IST

अर्थसंकल्पात तरतूद : १७ जिल्ह्यांतील १० हजार महिलांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्य शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील १७ जिल्ह्यांतील १० हजार महिलांना ई-पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत. त्यात अमरावतीचाही समावेश आहे. १० हजार ई-पिंक रिक्षांपैकी ३०० लाभार्थीही अमरावती जिल्ह्यातून निवडले जाणार आहेत. याबाबतचा आदेश शासनाने जारी केला आहे.

ई-पिंक रिक्षासाठी १० टक्के रक्कम ही लाभार्थी महिला वा मुलींना उचलावी लागेल. नागरी सहकारी बँका, जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकांकडून ई-पिंक रिक्षाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलणार तर कर्जाची परतफेड ही पूढील पाच वर्षांत करण्याची जबाबदारी लाभार्थीची आहे. आहे. महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा, नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावतीसह निवडक १७ शहरांत इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इच्छुक महिला ई-पिंक रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे लागणार आहेत.

अशी आहे योजनेच्या लाभार्थीची पात्रतायोजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी, बँक खाते पासबुक, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, चालक परवाना रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असणे अनिवार्य.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीसदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केलेली आहे. यामध्ये समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत. तर सदस्य म्हणून परिवहन अधिकारी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक, नागरी बालक विकास प्रकल्प अधिकारी व सदस्य सचिव म्हणून संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी राहणार आहेत.

पुरुषांनी चालविल्यास कारवाईई-पिक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालविली जात आहे, याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलिस विभाग आणि परिवहन विभागाची राहणार आहे. ई-पिंक रिक्षा पुरुष चालविताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद केली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती