शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३० हजार कोटींचे रस्ते पहिल्यांदाच; सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 09:50 IST

सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देमोबाईल फिल्ड लॅबचे उदघाट्न

आॅनलाईन लोकमतअमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.येथील मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात रविवारी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची त्यांनी बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांचा १० हजार किमींचा होत असलेल्या रस्त्याचा आढावा व हायब्रीड तत्त्वावरील रस्त्यांचाही त्यांनी माहिती घेतली. 'राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये मी आढावा घेत आहे. जेई टुु ईई यांच्या समस्या व त्यांना काम करताना येत असलेली अडचण मी जाणून घेत आहे', असे ना.पाटील म्हणाले. रस्त्यांची ईफिसिएन्सी व लॉयल्टी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे.महाराष्ट्रात यापूर्वी ५ हजार किमीचे नॅशनल हायवे होते. गेल्या तीन वर्षांत दिल्लीत पाठपुरवा करून ते २२ हजार किमीचे नॅशनल हायवे मंजूर करवून घेतले. २२ हजार किमीच्या नॅशनल हायवेला १ लाख ६ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २० हजार कोटी आतापर्यंत प्राप्त झाले असून ते पैसे रस्त्यांच्या भूसंपादनासाठी उपयोगात येणार आहेत.१० हजार किमीचे थ्री लाईन व नॅशनल हायवेची फोरलाई होती. महाराष्ट्रातील साडेसहा हजार किमीचे रस्ते नव्याने करण्यासाठी केंद्र शासनाने घेतले ते सहा पदरीकरण करणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची लांब ही आता ९६ हजार किमी झाली आहे.आढावा बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंग, आ. अनिल बोंडे, मुख्य अभियंता चंदशेखर तुंगे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटनयावेळी ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल फिल्ड लॅब कुठल्याही कामांवर जाऊन कामांचे गुणनियंत्रण करणार आहे.पॉझिटिव्ह काम करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहनसर्व अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह काम करा, खड्यांचे कामेही पॉझिटिव्ह होतील, असा कानमंत्रही ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. आपण जर चांगले काम केले तर त्यांचे समाधान व आनंद वेगळा मिळतो. अमरावतीच्या बाजारात आनंद विकत मिळतो काय, असा प्रश्न ना. पाटील यांनी करताच बैठकीत हशा पिकला.

टॅग्स :Politicsराजकारणstate transportराज्य परीवहन महामंडळ