शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३० क्विंटल तांदूळ ट्रकमधून घेऊन जात होते, पोलिसांनी पाठलाग केला अन्

By प्रदीप भाकरे | Updated: October 19, 2022 17:27 IST

दर्यापूर फाट्याजवळ पोलिसांची कारवाई

अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने बुधवारी वलगाव ठाण्याच्या हद्दीतील दर्यापूर फाट्याहून एका ट्रकमधून सुमारे ३० हजार ५४० किलो तांदूळ जप्त केला. त्या तांदळाच्या अधिकृततेबाबत संबंधित ट्रकचालक समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने ती कारवाई करण्यात आली.

एम एच ४० बी एल ७१०७ क्रमांकाच्या ट्रकमधून तांदळाची अवैध वाहतूक होत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांच्या पथकाने सिराज खान महमूद खान (२५, रा. खोलापुर ता. भातकुली) याला ताब्यात घेतले. ७ लाख ७५ हजार रुपये किमतीचा तांदूळ विक्री करिता तो गोंदिया येथे नेत असताना मिळून आला.

त्याला मालाच्या मालकाबाबत विचारपूस केली असता त्याने तो माल अमोल सुरेश महल्ले (रा. भातकुली) यांचा असल्याचे सांगितले. त्याच्याकडे त्या मालाचे खरेदीबाबत कोणतेही बिल किंवा कागदपत्रे आढळून आले नाही. त्यामुळे तोमाल शासकीय आहे किंवा कसे ? त्याच्या खरेदी बाबतची कागदपत्रे आहे किंवा कसे ? याबाबत पडताळणी करून पुढील कार्यवाहीकरिता तो ट्रक व त्यामधील तांदूळ असा मुद्देमाल वलगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीAmravatiअमरावती