लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असताना महापालिका क्षेत्रातील २८ कंटेनमेंट (प्रतिबंधित क्षेत्र) मध्ये कोरोनाची साखळी ब्रेक झाल्याची सुखद वार्ता आहे. या भागांमध्ये २८ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने नागरिकांच्या आवागमनासाठी ते आता खुले करण्यात आले आहेत.शहरात ४ एप्रिल रोजी पहिला कंटेनमेंट झोन नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत हाथीपुरा येथे जाहीर करण्यात आला. यानंतर लगतच्या परिसरात सातत्याने कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला. यानंतर तब्बल २५ दिवसांनी महापालिका क्षेत्रातील अन्य भागांमध्ये कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यादरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी किमान डझनभर कंटनमेंट झोन घोषित करण्यात आले व आरोग्य यंत्रणेचा वॉच ठेवण्यात आला. याव्यतिरिक्त आशा, एएनएम पथकांचे सर्वेक्षण, सहा मोबाईल क्लिनिक, स्वॅब सेंटर, फिव्हर क्लिनिक, क्वारंटाईन सेंटर आदी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्यात. सुरुवातीला नागरिक सूचनांना जुमानत नव्हते. मात्र, वाढती रुग्णसंख्या व महापालिका प्रशासनाद्वारे जनजागृती आदींमुळे या भागात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला व कोरोनाची साखळी खंडित करण्यात प्रशासनाला यश आले. शहरातील पहिला कंटेनमेंट झोन हा २४ दिवसांत निरस्त करण्यात आला व त्यानंतर सातत्याने कंटेनमेंट झोन निरस्त केले.कोरोना संक्रमित रुग्णाची नोंद झाल्यानंतर याचा प्रादुर्भाव शहरातील अन्य भागात होऊन नये, याची खबरदारी घेण्यासाठी बाधिताच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग नागरिकांच्या आवागमनासाठी बंद करण्यात येतात. या भागात आरोग्य पथकांचा वॉच असतो. पहिल्या १४ दिवसांत नवा कोरोनाग्रस्त व नंतरच्या १४ दिवसांत कोरोनासदृश लक्षणे असणारा एकही रुग्ण न आढळल्यास या भागात कोरोनाची साखळी खंडित झाली, असे गृहीत धरून महापालिका आयुक्तांद्वारे सदर कंटेनमेंट झोन निरस्त करण्यात येते. कंटेनमेंट झोन कमी झाल्याने अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे.हे प्रतिबंधित क्षेत्र आवागमनासाठी मोकळेशहरात १२० कंटेनमेंट झोन आहे. यापैकी २८ झोन आता निरस्त करण्यात आलेले आहे. यामध्ये हाथीपुरा, हैदरपुरा, हनुमाननगर, पटवीपूरा, माळीपूरा, पठानपूरा, ताज नगर, अझाद कॉलनी, खोलापूरी गेट, छायानगर, कंवर नगर, बापू कॉलनी, सुफीयाननगर, हबीबनगर, कुरेशीनगर, मालवीय चौक ते चित्रा टॉकीज, लालखडी, सिंधूनगर, पॅराडॉईज कॉलनी, बजरंग टेकडी मसानगंज, बेलपूरा, भाजीबाजार, महेंद्र कॉलनी, वल्लभ नगर, हजरत बिलाल नगर, गांधीनगर, मावदे प्लॉट, रिझर्व लाईन, फ्रेझरपूरा पट्टा क्रमांक २ आदी कंटेनमेंट झोनचा यामध्ये समावेश आहे.३८९ कोरोनामुक्त; ७६ टक्के प्रमाण'जिल्ह्यात ३८९ जण आता संक्रमणमुक्त झाले आहेत. रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होण्याचे प्रमाण हे ७६ टक्के आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, सुसज्ज आरोग्य यंत्रणा आदीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची सरासरी ६, तर कोरोनामुक्त होण्याची सरासरी ५ अशी दिलासादायक आहे. सद्यस्थितीत येथील कोविड रुग्णालयात संक्रमितावर पाच दिवस उपचार होतो व त्यानंतर पाच दिवस पीडीएमसी येथे निरीक्षणात ठेवले जाते. कोणतेही लक्षणे नसल्यास डिस्चार्ज देण्यात येते.
२८ कंटेनमेंट निरस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST
२८ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने नागरिकांच्या आवागमनासाठी ते आता खुले करण्यात आले आहेत. शहरात ४ एप्रिल रोजी पहिला कंटेनमेंट झोन नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत हाथीपुरा येथे जाहीर करण्यात आला. यानंतर लगतच्या परिसरात सातत्याने कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला.
२८ कंटेनमेंट निरस्त
ठळक मुद्देकोरोना साखळी ब्रेक : आठवडाभरात २५ वर झोन नागरिकांसाठी खुले