शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कायम विनाअनुदानित २६६ नवीन महाविद्यालये होणार सुरू

By गणेश वासनिक | Updated: February 17, 2024 19:17 IST

सर्वाधिक ८२ महिला महाविद्यालयांची मागणी; ईरादापत्र मागविले, विद्यापीठ स्तरावर कार्यवाही प्रारंभ.

अमरावती : वाढत्या लोकसंख्येनुसार मनुष्याच्या मूलभूत सोई, सुविधांसह शैक्षणिक गरजा देखील वाढत आहे. त्याअनुषंगाने यंदा राज्यात कायम विनाअनुदानित २६६ महाविद्यालयांची मागणी असून शासनाने ईरादापत्र मागविले आहे. यात सर्वाधिक ८२ महिला महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे वास्तव आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ आणि शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी ईरादापत्र मिळण्याबाबत प्रस्ताव शासन मान्यतेच्या शिफारसीसाठी पाठविले आहे. विद्यापीठांकडून प्राप्त प्रस्तावांची शासनस्तरावर ईरादापत्र देण्याविषयी निकषांनुसार तपासणी करण्यात आली आहे. अटी व शर्तीनुसार शासनाच्या प्रचलित धोरणाची अंमलबजावणी करून नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी ईरादापत्र हे कायम विनाअनुदानित तत्त्वावर महाविद्यालय सुरू करण्यासाठी राहणार असल्याची बाब राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केली आहे. शासनाकडून नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी देण्यात येणारे ईरादापत्र हे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वैध राहील. यूजीसी निकषानुसार महाविद्यालयात उपलब्ध सोयी-सुविधांसह दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सोयी-सुविधांची खातरजमा करावी लागेल.नवीन महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावात सर्वाधिक ८२ महिला महाविद्यालये असून मुंबई येथील श्रीमती नाथीबाई ठाकरसी दामोदर महिला विद्यापीठाला शासनाकडे तसा अहवाल पाठवावा लागणार आहे. शासन मान्यतेच्या शिफारसीसाठी विद्यापीठनिहाय नवीन कॉलेजचे प्रस्ताव

- मुंबई विद्यापीठ, मुंबई : १४- श्रीमती नाथीबाई ठाकरसी दामोदर महिला विद्यापीठ, मुंबई: ८२- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ५९- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : १०- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : ५- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : १३- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर : ११- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : ३१- कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव: १६- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड : २०- गोंडवाना विद्यापीठ, चंद्रपूर : ५

टॅग्स :Amravatiअमरावती