कृती आराखडा : कृषीपंपामुळे विजेचा अधिक वापर धामणगाव रेल्वे : तालुक्यात दररोज २६ हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. २ लाख ६६ हजार युनिटचा वापर होत असून १ लाख ६४ हजार रूपयांचा खर्च होत आहे. तालुक्यातील साडेसहा हजार कृषी पंपधारक महिन्याकाठी (१८ लाख युनिट) २२ लाख ५० हजार रूपयांचा विजेचा वापर होतो़धामणगाव तालुक्यात विजेचा वापर वाढला असला तरी वीज वितरण कंपनीने आपला कृती आराखडा तयार केला आहे़ तालुक्यात पाच फिडर पॉवर स्टेशन वरून घरगुती, औद्योगीक व कृषी पंपांना विज देण्यात येते़ जूना धामणगावच्या पाच एम़व्ही़ऐ़ या पॉवर स्टेशन वरून जूना धामणगाव, विरूळ रोंघे, दाभाडा, वाघोली या चार फिडर वरून आठ गावात विज पोहचते़ तब्बल ११६ डिपी वरून प्रत्येक गावात विजेचा वापर करण्यात येतो़ अंजनसिंंगी पॉवर स्टेशनमधून अंजनसिंगी, पिंपळखुटा, ढाकुलगाव अशा तीन फिडरने ११ गावात वीज वितरण करण्यात येते़ १०९ डीबीचा वापर केला जातो़ कृषीपंप आणि घरगुती ग्राहकांसाठी मंगरूळ दस्तगीर पॉवर स्टेशनवरून निंबोली गावठान तसेच कृषीपंप, मंगरूळ दस्तगीर, दिघी महल्ले, खानापूर, झाडगाव, अशा २३ गावांना ११० डिबीच्या माध्यमातून वीज पुरविण्यात येते़ देवगाव, येथील पॉवर स्टेशनच्या माध्यमातून तळेगाव दशासर गावठान, कृषीपंप तसेच बोरगाव धांदे गावठान आणि कृषीपंप अशा चार फिडरवरून शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना ८१ डिबी वरून वीज देण्यात येते़ पारेशन कंपनीच्या असलेल्या नारगावंडी येथील पॉवर स्टेशनवरून धामणगाव शहराला वीज देण्यात येते़ चिंचोली, तळेगाव दशासर, मंगरूळ दस्तगीर अशा चार फिडरच्या माध्यमातून १९३ डिबीमधून ग्राहकांना वीज देण्यात येते़ धामणगाव तालुक्यातील ६ हजार ५०० कृषी पंपधारक महिन्याकाठी १८ लाख युनिटचा वापर करतात. २२ लाख ५० हजार महिन्याला वीज वितरण कंपनीची वसुली होणे गरजेचे आहे़ परंतु अद्यापही ५ कोटी रूपये कृषी पंप धारक ाकडे थकीत आहे़ ज्या फिडर वरून गावठान व कृषीपंप आहेत त्या फिडरची महिन्याकाठी येणारी वसुली कमी आहे़ त्यामुळे या फिडर वर अधिभार असल्याने भारनियमनाचे प्रकार घडतात़ तालुक्यात २६ हजार घरगुती ग्राहक २ लाख ६६ हजार युनिट दररोज वापरतात. १ लाख ६४ हजार रूपयांची वीज वापरतेय. इंधनभार वीज आकार, वीज शुल्क इंधन समायोजन स्थिर आकार, सुरक्षा ठेव जमा या रकमेची बेरीज वेगळीच आहेत़
२६ हजार ग्राहक वापरतात २.५ लाख युनिट वीज
By admin | Updated: August 15, 2015 00:46 IST