शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरणासाठी २६ जानेवारी 'डेडलाईन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 22:49 IST

राजापेठ ते मर्च्युरी पॉइन्टपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या देखभालीचा अखेर मुहूर्त निघाला. रंगरंगोटीपासून या देखभालीची सुरुवात झाली.

ठळक मुद्देरंगरंगोटीला सुरुवात : पीडब्ल्यूडीला मिळाला कंत्राटदार

आॅनलाईन लोकमतअमरावती : राजापेठ ते मर्च्युरी पॉइन्टपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या देखभालीचा अखेर मुहूर्त निघाला. रंगरंगोटीपासून या देखभालीची सुरुवात झाली. उड्डाणपुलाच्या दुरवस्थेचे वृत्तांकन 'लोकमत'ने लोकदरबारी मांडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली. या कामासाठी निविदा काढून तत्काळ कंत्राटदार शोधण्यात आला. या कामासाठी २६ जानेवारीची डेडलाईन पीडब्लूडीकडून मिळाल्याने हे काम युध्दस्तरावर सुरू आहे.राजापेठ उड्डाणपूल अमरावतीची शान असताना काही वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाला उतरती कळा आली होती. या पुलाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारल्यानंतर त्यांनी निविदा काढल्या. मात्र, कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे पुन्हा उड्डाणपुलाच्या देखभालीसाठी निविदा काढण्यात आली. दरम्यानच्या काळात पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांचा शोध घेतला. राजापेठ ते मच्युरी पाईन्ट व गाडगेनगर-पंचवटी या दोन्ही उड्डाणपुलाच्या देखभालीच्या जबाबदारीसाठी कंत्राटदार मिळाला. दोन्ही उड्डाणपुलाच्या देखभालीसाठी ३६ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यानुसार सद्यस्थितीत राजापेठ ते मर्च्युरी पॉईन्टपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या देखभालीचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वप्रथम उड्डाणपुलाच्या सुरक्षा कठड्यांची रंगरंगोटीला सुरुवात करण्यात आली असून त्यानंतर झेब्रा कॉन्सिंग, दिशादर्शक फलके, पट्टे व अन्य कामी केली जाणार आहे.पहिल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा निविदा काढली. तेव्हा कंत्राटदार मिळाला. प्रथम रंगरंगोटी सुरु केली. २६ जानेवारीपर्यंत कामे उरकण्यासाठी सांगण्यात आले.- सदानंद शेंडगे,कार्यकारी अभियंता. बीअ‍ॅन्डसी