शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

२२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण

By जितेंद्र दखने | Updated: May 15, 2024 22:42 IST

राज्य शासनाकडून जिल्ह्यातील २५ या शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे.

अमरावती : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, इंग्रजी शाळांच्या तुलनेत शाळांचे विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, राज्य शासनाकडून जिल्ह्यातील २५ या शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २२ कोटी ३७ लाख ७३ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या शाळांसाठी राज्य शासनाने वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या सहा शाळांकरिता सुमारे कोटी ३ कोटी ६९ लाख ३० हजार आणि वर्ष २०२३-२४ मध्ये १९ शाळांकरिता सुमारे १८ कोटी ६८ लाख ४३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अशा सुमारे २२ कोटी ३७ लाख ७३ हजार रुपयांच्या निधीमधून जिल्हा परिषदेच्या २५ शाळांची ओळख आदर्श शाळा म्हणून या निधीतून विकसित केले जाणार आहे. या निधीमुळे जिल्हा परिषद शाळाही इंग्रजी शाळांच्या धर्तीवर हायटेक होणार आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

अत्याधुनिक पद्धतीने बांधकामजिल्ह्यातील १४ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवीन बांधकामे करण्यात येणार आहेत. या वर्गखोल्या अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहेत. यापैकी काही शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. सध्या केवळ गतवर्षी आलेल्या निधीमधून शाळेची कामे सुरू आहेत, तर उर्वरित शाळेसाठी गत मार्च महिन्यात निधी आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही कामे सुरू हाेणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

या शाळांचा बलणार चेहरा मोहरा चांदुर बाजार तालुक्याती  घाटलाडकी, शिरजगाव कसबा, बेलोरा, तळेगाव मोहना, विश्रोळी, राजना पूर्णा  कारंजा बहिरम, तोंडगाव ,शिरजगाव कसबा,ब्राम्हणवाडा थडी, शिरजगांव बंड, देऊरवाडा, धामनगांव रेल्वे मधील अंजनसिगी,मार्डी (तिवसा),बेनोडा (वरूड),हरम (अचलपूर),नांदुरा (अमरावती),पांढरी (अंजनगाव सुजी) टाकरखेडा (भातकुली), जळका जगताप (चांदुर रेल्वे), गांगरखेडा (चिखलदरा),येवदा(दर्यापूर), खिडकीकलम (धारणी), नेरपिंगळाई (मोर्शी), शिवणी रसुलापूर (नांदगाव खंडेश्वर)या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या सन २०२२-२३ आणि २३२४ या आर्थिक वर्षात २५ शाळांच्या नवीन बांधकामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून २५ शाळा आदर्श म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.- बुद्धभूषण सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :Schoolशाळा