शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२५ ग्रामपंचायतींमध्ये झाले ग्रामसेवकाविना ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:16 IST

तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

ठळक मुद्दे‘एक ग्रामपंचायत - एक सचिव’ कागदावर : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरच्या मेळघाटचे चित्र

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.चिखलदरा तालुक्यात दीडशेवर गावांसाठी ५४ ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कारभार केवळ २९ ग्रामसेवक सांभाळतात. त्यामुळे स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, महाराष्ट्र दिन सोहळ्याला ध्वजारोहणासाठी सचिव मिळत नसल्याची बोंब कायम आहे. चिखलदरा तालुका विस्ताराने सर्वाधिक मोठा असल्याने ८०ते १०० किलोमीटर अंतरावरील तीन ते चार ग्रामपंचायतीचा कारभार एका सचिवाकडे आहे. प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान चार ते पाच गावे आहेत. बुधवारी झालेल्या १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी तब्बल २५ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची दरवर्षीप्रमाणे मदत घेण्यात आली. तालुक्यासाठी ग्रामसेवकांची ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी तीन ग्रामसेवक निलंबित, तर तीन बेपत्ता आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात आदिवासींच्या पाड्यांचा विकास कुठे थांबला, याची चिकित्सा स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी गाठण्यापूर्वी होणे गरजेचे ठरले आहे.शासकीय योजनांसाठी ससेहोलपटवीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ता या मूलभूत सुविधांचा अभाव मेळघाटच्या नशिबी आजही आहे. कुपोषणाने बालमृत्यूच्या आकडेरीत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य व बाल विकास प्रकल्प कार्यालयाची यंत्रणा त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च गेला तरी कुठे, असे म्हणायची वेळ आली आहे. अतिदुर्गम हतरू परिसरातील २० गावांमध्ये आजही रस्ता, वीज, पाणी या सुविधा बेपत्ता आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात सर्वाधिक टँकर जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात लागतात.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसgram panchayatग्राम पंचायत