शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यातील २४६ शाळांमध्ये रुजला ‘ज्ञान रचनावाद’

By admin | Updated: February 17, 2016 00:08 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाने स्वीकारलेला ...

कृतीतून शिक्षण : कागद, फरशीवर स्वयंअध्ययन, हजार शाळांचे लक्ष्य प्रदीप भाकरे अमरावतीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाने स्वीकारलेला ‘ज्ञान रचनावाद’ जिल्ह्यातील २४६ शाळांमध्ये रुजला आहे. जिल्ह्यातील २ हजारांहून अधिक शाळांमधून या शाळा ‘मानरचनावादी’ या व्याख्येत आल्या आहेत. या शाळांमध्ये हसत, खेळत स्वयंअध्ययनावर भर दिला जात आहे. राज्यात २२ जून २०१५ अन्वये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी यात ज्ञान रचनावादाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विविध साहित्यातून मुलांना आकलन व्हावे, त्यासाठी या शाळांमध्ये साहित्य निर्मिती करण्यात आली. बनावट नोटा, पुष्ठे, फरक, चित्रतक्ता, कार्ड, काड्यांचे गठ्ठे याचा यात समावेश आहे. वाचन, आकलन, लेखन व उपयोजन यात एकही मूल अप्रगत राहणार नाही, असा हेतू आहे. राज्यात मिरज आणि कुमठे येथे ज्ञान रचनावादास धरुन बहुवर्ग/ बहुस्तर अध्ययन करण्याचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अशाठिकाणी एकही अप्रगत विद्यार्थी नाही. त्याचप्रमाणे प्रगत विद्यार्थीसुद्धा अधिक प्रगती करीत आहेत. तीच पद्धत जिल्ह्यातील २४६ शाळांनी अंगीकारली आहे. रचनावादी शाळेत काय?शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये फरशीवर बसून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला प्रेरित करतो. अंकाचे स्थान समजून देण्यासाठी शिक्षक काड्यांचे गठ्ठे, मणी, माळा, याशिवाय एक, दहा, शंभर, पाचसे व एक हजारांच्या खोट्या नोटा जमवून अथवा मुलांच्या मदतीने कार्डावर लिहून संख्या तयार करतात. जमिनीवरील फरशीवर किंवा पाटीवर आखलेल्या कोष्टकांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे, असे हे संस्करण आहे. विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित या दोन्ही विषयांची समज वाढविण्यासाठी ‘मुलगा स्वत: शिकू शकतो, ज्ञानाची निर्मिती करू शकतो, या संकल्पेवर आधारित साहित्य निर्मिती या शाळांमध्ये करण्यात आली आहे. २४६ शाळा ज्ञान रचनावादी झाल्या असून जवळपास एक हजार शाळांचे डायरने उद्दिष्ट ठेवले आहे. सांस्कृतिक भवनात आज कार्यशाळा जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा प्रगत व्हाव्यात, ज्ञान रचनावाद वृद्धींगत व्हावा, यासाठी १७ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता कार्यशाळा होणार आहे. यात डायटच्या प्राचार्यांसह, शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षण उपसंचालक येणार आहेत. यात कल्पक प्रयोग साकारणाऱ्या शिक्षकांचा सत्कार होत असून मिरजचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी आणि कुमठे बिटच्या विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. वर्गरचना बदलली ज्ञान रचनावाद ही पद्धत अंगिकारलेल्या शाळांमध्ये वर्गरचनाच बदलली आहे. डेस्क बेंचच्याऐवजी जमिनीवर बसवून गटपद्धतीने मुलांना स्वत: आकलन होईल त्या पद्धतीने साहित्य निर्मिती करण्यात आली आहे. मुले स्वत: शिकतात चांगला संस्कार मुले स्वत:वर करुन घेतात. कुणी मोठ्यांना न सांगता एकत्र येतात. नियोजन करतात. नेतृत्व करतात. कामाची वाटणी करतात. सहकार्याने वागतात. वाद-विवाद करतात. गट्टी-फू म्हणतात. ‘सुटली’ म्हणून लगेच गळ्यात गळे घालतात. स्वत:च निर्मिती करतात. या प्रकारे या शाळा ‘अ‍ॅक्टिव्हिटी बेस’ झाल्या आहेत. भाषा आणि गणित अभ्यासक्रमावर आधारित साहित्यनिर्मिती करण्यात आली. चिखलदऱ्यात १९ शाळा रचनावादी कोरकू भाषिक व आदिवासीबहुल चिखलदरा तालुक्यातील १९ शाळा रचनावादी झाल्या आहेत. हसत-खेळत आणि साहित्यातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. शिक्षकही मुलांसमवेत फरशीवर बसून या आनंददायी शिक्षणात भूमिका बजावतो आहे. इयत्तानिहाय साहित्याचा वापर इयत्तानिहाय साहित्य वापरल्यास संकल्पना स्पष्ट होतात. ही यामागील भूमिका आहे. ज्ञान रचनावादी शाळा घडविण्यासाठी जानेवारीत साहित्यनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आल्यात.