शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विधानसभेसाठी आठ मतदारसंघांत २४.५४ लाख मतदार; प्रारूप मतदारयादी आज होईल प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:51 IST

Amravati : लोकसभेच्या तुलनेत ५५ हजार मतदारांची भर; महिला मतदारांची संख्या जास्त

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेल्या प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी आयोगाच्या मान्यतेने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंगळवारी जाहीर करतील. जिल्ह्यात सद्यस्थितीत २४,५४,८४८ मतदार आहेत. यामध्ये लोकसभेच्या तुलनेत ५५,५६५ मतदारसंख्येची भर पडली आहे.

राज्य निवडणूक आयोगाद्वारा विधानसभा निवडणुकीची लगबग सध्या सुरू आहे. एकही पात्र वंचित राहू नये, यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. त्यामुळे मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. शिवाय २७ व २८ जुलै तसेच ३ व ४ ऑगस्टला मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विशेष शिबिर घेण्यात आलेले आहे. यामध्ये नावात दुरुस्तीसह नवमतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. 

प्रारूप मतदारयादी ६ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या यादीवर २० ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविण्यात येईल व यावर २९ तारखेपपर्यंत सुनावणी होईल व विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. जिल्ह्यात २३ जानेवारी २०२४ ला २३,९९,२८३ मतदार होते. त्यानंतर ४ एप्रिल २०२४ ला २४,२५,००४ व आता ५ ऑगस्टला २४५४८४८ मतदारसंख्या झालेली आहे.

६२३८ ने स्त्री मतदार जास्तविधानसभेसाठी ५५,५६५ मतदार लोकसभेच्या तुलनेत वाढले आहे. यामध्ये २४६६० पुरुष व ३०८९८ महिला मतदार आहेत. यामध्ये ६२३८ स्त्री मतदारसंख्या जास्त आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये धामणगाव मतदारसंघात ३२४३, बडनेरा १०२६४, अमरावती १८६०६, तिवसा ४६६२, दर्यापूर ४३५४, मेळघाट ५३३४, अचलपूर ४३३४ व मोर्शीमध्ये ४७६८ मतदार वाढले आहेत.

आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदारमतदारसंघ                  पुरुष                    स्त्री              इतर           एकूणधामणगाव                   १५७१९२              १५१९६५             ०२            ३०९१५९बडनेरा                       १७५१४९              १६९७९२            ४३            ३४४९८४अमरावती                    १८१८०४              १७५४३७            २६           ३५७२६७तिवसा                        १४७४४६              १३९१२२             ०२           २८६५७०दर्यापूर                        १५५९६९             १४५७७६            ०४           ३०१७४९मेळघाट                       ४९९६२                १३९११४             १०           २८९०८६अचलपूर                      १४५४४३              १३७३२८             ०५          २८२७७६मोर्शी                           १४६२२०              १३७०३६              ०१          २८३२५७ एकूण                          १२५९१८५            ११९५५७०            ९३         २४५४८४८ 

टॅग्स :Votingमतदानvidhan sabhaविधानसभाAmravatiअमरावती