शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 मेळघाटातील दहा पीएचसीत मिळणार २४ तास वीजपुरवठा; बहूप्रतिक्षेनंतर सुटला तिढा 

By जितेंद्र दखने | Updated: June 29, 2023 18:12 IST

सदरचा हा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाने मंजूर केला आहे.

अमरावती : मेळघाटातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी विद्युत पुरवठ्यासाठी जनरेटर आणि जनरेटरच्या बॅटरी खरेदीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सादर केला होता. सदरचा हा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता दहा आरोग्य केंद्रात २४ तास वीजपुरवठा राहणार आहे.

चिखलदरा तालुक्यातील सलोना, काटकुंभ, हतरू, सेमाडोह, हरिसाल आणि धारणीमधील टेब्रुसोंडा, बैरागड, बिजुधावडी, कळमखार, धूळघाट रेल्वे आदी प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याचे आरोग्य यंत्रणेला विविध अडचणीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने वरील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. राज्य शासनाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे वरील पीएचसीत २४ तास कायमस्वरूपी विद्युत पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जनरेटर खरेदीसाठी तसेच हरिसाल पीएचसीत जनरेटची बॅटरी खरेदीसाठी सुमारे ६२ लाख ४५ हजार ४८० रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. याप्रमाणे दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ केव्ही क्षमतेचे फुल लोडेड जनरेटर खरेदी केले जाणार आहेत, तर हरिसाल पीएचसीमध्ये १२ केव्ही ८० एच जनरेटरची बॅटरी खरेदी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, जनरेटरच्या इंधनाकरिता दरवर्षी सुमारे २ लाख ६४ हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. याकरिता आवर्ती खर्च तसेच जनरेटरची नवीन खरेदीबाबतचा खर्च लेखाशीर्ष २२१० वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य (०२) प्राथमिक आरोग्य केंद्रे (स्थानिक क्षेत्रे) सहायक अनुदाने वेतनेतर यामधून करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने पीएचसींना दिले आहेत. यामुळे १० प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास कायमस्वरूपी वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खरेदी समितीजनरेटर व जनरेटरची बॅटरी खरेदी करताना शासनाने ठरवून दिलेल्या अर्टी व शर्तीचे पालन करून खरेदीची संपूर्ण प्रक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात होईल. ही खरेदी शासनाच्या जीईएम पोर्टल किंवा बाजारातून खुल्या निविदाद्वारे करावयाची आहे. ही खरेदी करताना शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय खरेदी करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खरेदी समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावतीelectricityवीज